33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ गडचिरोली आज 71 जण कोरोनामुक्त तर 71 जण नवीन बाधित

गडचिरोली आज 71 जण कोरोनामुक्त तर 71 जण नवीन बाधित

0
112

blank

गडचिरोली : दि. 12 ऑक्टो. – आज जिल्ह्यात 71 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. तसेच आज नवीन 71 कोरोना बाधितांचीही भर पडली. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 4038 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 3033 वर पोहचली. तसेच सद्या 973 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 32 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.11, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 24.1 तर मृत्यू दर 0.79 झाला.

आज कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांमध्ये गडचिरोली 35, अहेरी 0, आरमोरी 9, भामरागड 0, चामोर्शी 6, धानोरा 4, एटापल्ली 9, मुलचेरा 1, सिरोंचा 0, कोरची 0, कुरखेडा 1 व वडसा मधील 6 जणांचा समावेश आहे.

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली 46, अहेरी 1, आरमोरी 11, भामरागड 0, चामोर्शी 2, धानोरा 4, एटापल्ली 3, कोरची 0, कुरखेडा 2, मुलचेरा 0, वडसा 0 व सिरोंचा येथील 2 जणांचा समावेश आहे. यामध्ये गडचिरोली 46 मध्ये जिल्हा सामान्य रूग्णालयातील 1, गोगाव 1, रामपुरी वार्ड 1, आयोध्यानगर 1, बसेरा कॉलनी 1, चनकाई नगर 1, चुरमूरा 1, सीआरपीएफ 2, पोलीस 1, गांधी वार्ड 1, कन्नमवार वार्ड 1, कोटगल 1, लक्ष्मीनगर 6, नेहरू वार्ड 1, एनटीसी गडचिरोली 1, पोलीस कॉलनी 1, रामनगर 2, रामपुरी वार्ड 7, रेड्डी गोडावून 1, सर्वोदया वार्ड 2, स्नेहानगर 1, सोनापूर कॉ.2, विसापूर 1, शहरातील इतर 1 व इतर जिल्हयातील 7 जणांचा समावेश आहे.
इतर तालुक्यांमध्ये अहेरीमधील 1 जण स्थानिक, आरमोरी 11 मध्ये सर्व जण स्थानिक आहेत. चामोर्शी 2 मध्ये येनापूर 1 व स्थानिक एक जणाचा समावेश आहे. धानोरा 4 मध्ये कारवाफा 2, आझाद वार्ड 1 व सीआरपीएफ 1 जवानाचा समावेश आहे. एटापल्ली 3 मध्ये सर्व शहरातील आहेत. कुरखेडा 2 दोन्ही स्थानिक आहेत. सिरोंचा 2 मधील ग्रामीण रूग्णालयातील दोघे आहेत.

blank