32.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ गोंदिया-११४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

गोंदिया-११४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

८० रुग्ण कोरोनातून मुक्त

0
797

blank

गोंदिया,दि.१४= जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी जास्त होतांना दिसत आहे.गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेच्या आज १४ ऑक्टोबर रोजी प्राप्त अहवालातुन नवीन ११४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. जिल्ह्यातील विविध कोविड सेंटर येथे उपचार घेत असलेले ८० रुग्ण औषधोपचारातून कोरोनामुक्त झाल्याने सुट्टी देण्यात आली.

नव्याने आज ११४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तालुकानिहाय पुढील प्रमाणे. गोंदिया तालुका-४५, तिरोडा तालुका -१८,गोरेगाव तालुका-१५, आमगाव तालुका-०२,सालेकसा तालुका-०५, देवरी तालुका १७, सडक/अर्जुनी तालुका- ०१,अर्जुनी/मोरगाव- ११ असे आहेत.

कोरोना बाधित आढळलेले आजपर्यंतचे रुग्ण तालुकानिहाय. गोंदिया तालुका- ४७६५,तिरोडा तालुका -१०५४, गोरेगाव तालुका -३५१, आमगाव तालुका -५२६, सालेकसा तालुका -३६५, देवरी तालुका-३४०, सडक/अर्जुनी तालुका-३११,अर्जुनी/मोरगाव तालुका-३५२ आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले- ८९ रुग्ण आहे.असे एकूण ८१५३ रुग्ण आढळले आहे.

८० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर आज मात केली.तालुका निहाय ते रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे.गोंदिया तालुका-६१, तिरोडा तालुका -००, गोरेगाव तालुका-००, आमगाव तालुका -०६, सालेकसा तालुका-०२, देवरी तालुका-०४, सडक/अर्जुनी तालुका -०३ आणि अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील चार रुग्णाचा समावेश आहे.

७३९५ रूग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली.ते रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे.गोंदिया तालुका – ४३०६,तिरोडा तालुका- ९८५, गोरेगाव तालुका-३१६,आमगाव तालुका-४८७,सालेकसा तालुका- ३५०,देवरी तालुका-२९९,सडक/अर्जुनी तालुका-२७७,अर्जुनी/मोरगाव तालुका-२९५ आणि इतर-८० रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील क्रियाशील रुग्णांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका -३९४,तिरोडा तालुका-५४, गोरेगाव तालुका
-३१ ,आमगाव तालुका-३३, सालेकसा तालुका -१३, देवरी तालुका – ३९, सडक/अर्जुनी तालुका- ३१,अर्जुनी/मोरगाव तालुका-५५ असे एकूण ६५० कोरोना क्रियाशील रुग्ण विविध शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.

जे क्रीयाशील रुग्ण आहेत त्यापैकी ३२४ रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. ते तालुकानिहाय पुढीलप्रमाणे गोंदिया तालुका-१७२, तिरोडा तालुका-३२, गोरेगाव तालुका -१७,आमगाव तालुका-२२,सालेकसा तालुका-०७,देवरी तालुका-२२ , सडक/अर्जुनी तालुका- २१,अर्जुनी/मोरगाव तालुका -३१ रुग्ण घरीच अलगिकरणात आहे.

गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण ३४०७४ नमुने पाठविण्यात आले. यामध्ये २६२७९ नमुने निगेटिव्ह आले. तर ५१०५ नमुने पॉझिटिव्ह आले आहे.३११ नमुन्यांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे.

गृह विलगिकरणात १४४ व्यक्ती आणि संस्थात्मक विलगीकरणात २ व्यक्ती आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध रॅपिड अँटीजेन टेस्टमधून घेण्यात येत आहे. या चाचणीतून आतापर्यंत २९६४१ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये २६६८३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. २९५८ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ३२ चमू आणि २८ सुपरवायझर २८ कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे. यामध्ये गोंदिया तालुका-०४, आमगाव तालुका-००,सालेकसा-०२,देवरी तालुका-०३,सडक/अर्जुनी तालुका-०१, गोरेगाव तालुका-०५ तिरोडा तालुका -१३ आणि अर्जुनी/मोरगाव तालुका-०० असे एकूण २८ कंटेंटमेंट झोन जिल्ह्यात कार्यरत आहे.

माझे कुटुंब-माझी जबाबदारी-माझी जनजागृती या मोहिमेअंतर्गत जिल्ह्याच्या १४ लाख ११ हजार ४२५ लोकसंख्येपैकी १३ ऑक्टोबरपर्यंत १३ लाख ४१ हजार ६५५ लोकांची प्रथम आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.हे प्रमाण ९५ टक्के इतके आहे. त्यामध्ये एकूण ७५८ आजारी रूग्णांच्या घशाचे नमुने तपासण्यात आले.त्यापैकी २२८ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यात कोरोना वॉर रूम तयार करण्यात आली असून त्यावर रुग्णांना २४ तास सेवा उपलब्ध राहणार आहे.काही समस्या असल्यास ८३०८८१६६६६ आणि ८३०८८२६६६६ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.

कोरोना चाचणी केल्यानंतर बाधित रुग्णांच्या सुविधेसासाठी सर्व रुग्णांना त्यांनी दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर त्याचा कोविड-१९ चा अहवाल एस एम एस द्वारे कळविण्यात येतो.हा अहवाल ग्राह्य धरावा.असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांनी कळविले आहे.

blank