गोंदिया-कुंभारेनगर येथील रहिवासी छायाचित्रकार जगदीश नारनवरे( वय ६५ वर्षे) यांचे रविवारी( ता.१८ ऑक्टोबर )अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी ,तीन मुली व दोन मुले असा आप्त परिवार आहे.
ते गोंदिया शहरातील प्रसिद्ध छायाचित्रकार होते. उल्लेखनीय म्हणजे त्यांनी आपल्या चित्रकलेतून साकारलेल्या ‘अशोक स्तंभाला’ माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी कौतुक करून त्यांना उत्कृष्ट चित्रकार म्हणून संबोधले होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.