39 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home Top News मुख्यमंत्री ठाकरे पोचले सोलापूरच्या पुरग्रस्त भागात,साधला पुरग्रस्तांशी सवांद

मुख्यमंत्री ठाकरे पोचले सोलापूरच्या पुरग्रस्त भागात,साधला पुरग्रस्तांशी सवांद

0
233

blank

सोलापूर(विशेष प्रतिनिधी)दि.19– सोलापूर जिल्ह्यातील पुरस्थितीची आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आगमन झाले असून पावसामुळे अक्कलकोट तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी रवाना झाले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सकाळी साडेनऊच्या सुमाराला सोलापुरात आगमन झाले. नियोजित कार्यक्रमानुसार मुख्यमंत्री फ्रेश होण्यासाठी सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात जाणार होते. परंतु, विमानतळावर पोहोचताच त्यांनी आपला ताफा शेतकऱ्यांच्या बांधावर घेण्याचे फर्मान सोडले. शासकीय ताफा अक्कलकोट तालुक्याच्या दिशेने रवाना झाला. विमानतळावर स्वागतमुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे विमानतळावर आगमन होताच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री  विजय वडेट्टीवार,  कृषीमंत्री दादा भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार प्रणिती शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, दिलीप माने यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांसोबत खासदार विनायक राऊत आदी हजर होते. विमानतळावर पोहोचताच मुख्यमंत्र्यांनी काही नेत्यांची चर्चा केली. चला आपल्याला थेट शेतकऱ्यांना भेटायचे आहे असे सांगून ताफा अक्कलकोटच्या दिशेने निघण्याचे आदेश पोलिसांना दिले.या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पूरग्रस्त नुकसानीचा पाहणी दौरा सुरुवातीला वादात पडला आहे. स्थानिक प्रशासन आणि गावकऱ्यांमध्ये या भेटीचा वाद निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे आपल्या दौऱ्याची सुरुवात सांगवी खुर्द या गावातून करणार होते. मात्र, प्रशासनाने गावकऱ्यांनाच पूल पार करुन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला बोलावले ग्रामस्थ नाराज झाले असून आम्ही जाणार नाही,मुख्यमंत्र्यानीच यावे हा हट्ट धरला आहे.

blank