गोंदिया,दि.१९ : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शिक्षकांच्या प्रलंबित २५ मागण्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप डांगे यांना दिले निवेदन देवून तक्रार निवारण सभेत चर्चा घडवून आणली. यावेळी नक्षलभत्ता कमालमर्यादेत १५०० रूपये व अतिरिक्त घरभाडे संदर्भातील प्रश्न प्राधान्याने सोडविला जाईल असे आश्वासन डांगे यांनी तक्रार निवारण सभेत दिले.सभेला नरेश भांडारकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. एल.पुराम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अमृता परदेशी, शिक्षणाधिकारी (प्राथ.) राजकुमार हिवारे, उपशिक्षणाधिकारी (प्राथ.)आर.पी.रामटेके, शिक्षण विस्तार अधिकारी डी.एम.मालाधारी,अधीक्षक जनबंधू व इतर कर्मचारी उपस्थित होते. चर्चेत जीपीएफ-डिसीपीएस मार्च २०२० पर्यंतचा हिशोब मिळणे हा प्रश्न आक्रमक पणे ठेवण्यात आला. यावर डांगे यांनी उपस्थित अधिकाèयांसोबत चर्चा केली व १० जणांचे यूनिट तयार करून कायमस्वरूपी प्रश्न निकाली काढले जाणार असल्याचे सांगीतले.तसेच सीएमपी वेतनप्रणाली लागू करणे, उच्चश्रेणी मुख्याध्यापक, विषय शिक्षक व शिक्षण विस्तार अधिकाèयांची रिक्त पदे भरण्यात यावी, २ जानेवारी रोजी कर्मचाèयांना वेतनवाढ लावणे, विषय शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, १२ वर्षे झालेल्यांना चटोपाध्याय वेतन श्रेणी व २४ वर्षे झालेल्यांना निवड श्रेणी मंजूर करण्यात यावी, उच्च परिक्षेला बसण्याची परवानगी व कार्येत्तर परवानगी आदेश काढण्यात यावे, ४% सादीलवार राशी शाळांना देण्यात यावी, २००९ नंतर नोकरीत लागलेल्या शिक्षकांना सेवेत कायम करण्यात यावे, कोविड-१९ अंतर्गत कामावर असताना मरण पावलेल्या शिक्षकांना विमा संरक्षण लाभ देण्यात यावा, जिल्हा व राज्य आदर्श शिक्षक सेवानिवृत्त झाल्यानंतर वेतन वाढीची राशी वसूल करण्यात येवू नये, ओबीसी-एनटी प्रवर्गातील विद्याथ्र्यांचे (२०१९-२०) कोरोनामुळे राहिलेले प्रस्ताव समाज कल्याण विभागात घेण्यात यावे, माध्यमिक- प्राथमिक पात्र शिक्षकांना वरिष्ठश्रेणी व निवळश्रेणीचा लाभ देणे.कार्यशाळा घेऊन अनेक पात्र माध्यमिक- प्राथमिक शिक्षकांना विषय शिक्षक , मुख्याध्यापक, केद्रप्रमुख विस्तार अधिकारी पदोन्नती देणे. अतिरिक्त दाखविलेल्या 9-10 वीच्या शिक्षकांना न्याय मिळवून देण्यात यावे.जिप माध्यमिक शाळेत कार्यरत कंत्राटी प्रयोगशाळा सहायकांना नियमित करण्यासंबंधाने लवकरच निर्णय घेणे.माध्यमिक विभागात शिक्षक भरती नसताना काही शाळांना शिक्षक मान्यता व शालार्थ आयडी देण्यात आली आहे, त्या संबंधाने चौकशी करण्याची मागणी मान्य केली.30 जूनला सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मंजूर करण्यात यावी.ग्रामपंचायत द्वारा जुलै महिन्यात शाळांना निर्जंतुकीकरण करण्यात आले परत ते करण्यासाठी पुढाकार घेणे.सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडविण्याचे आश्वासन डांगे यांनी दिले. बैठकीला शिक्षक कृती महासंघाचे प्राचार्य व्ही डी मेश्राम,आनंद पुंजे ,रमेशकुमार तनवाणी,डी टी कावळे,गुणेश्वर फुंडे,रेशीम कापगते,मिलिंद मेश्राम,असिम बँनर्जी,जी एम खान,प्राचार्य बी डब्ल्यू कटरे,प्रमेश बिसेन,शिक्षक सहकार संघटनेचे रवीद्र अंबुले, प्रदिपकुमार मेश्राम,प्रदिप गणवीर,शिक्षक भारतीचे महेंद्र सोनवाने,राजेंद्रकुमार कडव,एल यु खोब्रागडे,मुकेश रहागडाले,राजानंद वैद्य,हरिराम येळणे,जी एस मौदेकर,सुरेंद्र जगने,सुरेंद्र गौतम,बी एफ बालपांडे,एम.जे.बढे,बी.ए.जांगडे,एच.बी.मेंढे,एस.यु.वंजारी, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे,अनिरुध्द मेश्राम,केदार गोटेफोडे,नुतन बांगरे,शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज दिक्षित,सरचिटणीस एल.यू.खोब्रागडे,किशोर डोंगरवार,संदीप तिडके,एन.बी.बिसेन आदींनी २५ प्रश्नांवर चर्चा घडवून आणली.