
गोंदिया,दि.28 ृ कोरोना संसर्गाचा आलेख जिल्ह्यात कमी होतांना दिसत आहे.ही समाधानाची बाब आहे.बाधित रुग्ण उपचारातून बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.संसर्ग जरी कमी होत असला तरी प्रत्येकाने दक्षता बाळगणे आवश्यक आहे.गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 28 ऑक्टोबर रोजी प्राप्त अहवालात नव्याने 97 कोरोना बाधित रूग्ण आढळले आहे. 106 बाधित रूग्णांनी कोरोनावर मात केल्याने आज त्यांना सुट्टी देण्यात आली.
नव्याने आज जिल्ह्यात 97 कोरोना बाधित रुग्ण आढळले. ती रुग्णांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-43, तिरोडा तालुका -02, गोरेगाव तालुका-04,आमगाव तालुका-10, सालेकसा तालुका-09, देवरी तालुका-09, सडक/अर्जुनी तालुका-11, अर्जुनी/मोरगाव तालुका-08 आणि बाहेर जिल्हा/ बाहेर राज्यातील एक रुग्ण आढळून आला.
जिल्ह्यात आजपर्यंत तालुकानिहाय आढळलेले बाधित रुग्ण पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-5450, तिरोडा तालुका-1130, गोरेगाव तालका- 392,आमगाव तालुका-673, सालेकसा तालुका-406, देवरी तालुका-456, सडक/अर्जुनी तालुका-416,अर्जुनी/मोरगाव तालुका-508 आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले-108 रुग्ण आहे.असे एकूण 9539 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे.
शासकीय व खाजगी कोविड रुग्णालय तसेच कोविड केन्द्रात उपचार घेत असलेल्या 106 रूग्णांनी आज कोरोनावर मात केली. तालुकानिहाय ती रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-29, तिरोडा तालुका-16, गोरेगाव तालुका-06, आमगाव तालुका-21, सालेकसा तालुका-00, देवरी तालुका-10, सडक/अर्जुनी तालुका-01, अर्जुनी/मोरगाव तालुका-20 आणि बाहेर जिल्हा/बाहेर राज्यातील 03 असे रुग्ण आढळले.
आतापर्यंत 8590 रूग्णांनी कोरोनावर मात केली. ती रुग्ण संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे.गोंदिया तालुका-4879 तिरोडा तालुका-1101, गोरेगाव तालुका-360, आमगाव तालुका-625, सालेकसा तालुका-367, देवरी तालुका-394, सडक/अर्जुनी तालुका-372, अर्जुनी/मोरगाव तालुका-404 आणि बाहेर जिल्हा/राज्यातील 88 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 89.77 टक्के आहे. बाधीत रुग्णांचा मृत्यु दर हा 1.25 टक्के आहे. तर डब्लिंग रेट हा 93.07 टक्के आहे.जिल्ह्यातील 123 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया तालुका-73, तिरोडा तालुका-17, गोरेगाव तालुका-4, आमगाव तालुका-6, सालेकसा तालुका-2, देवरी तालुका-4, सडक/अर्जुनी तालुका-3, अर्जुनी/मोरगाव तालुका-4 व बाहेर जिल्हा व राज्यातील दहा रुग्णांचा समावेश आहे.
यवतमाळ, दि. 28 : गत 24 तासात जिल्ह्यात 52 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला आहे. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर व कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 46 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.मृतकामध्ये यवतमाळ शहरातील 78 वर्षीय महिला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.28) रोजी एकूण 413 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 52 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 361 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 404 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10033 झाली आहे. आज 46 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8922 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 344 मृत्युची नोंद आहे. यात 25 मृत्यु हे 5 सप्टेंबर 2020 ते 2 ऑक्टोबर 2020 या कालावधीतील खाजगी रुग्णालयात झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 89900 नमुने पाठविले असून यापैकी 89538 प्राप्त तर 362 अप्राप्त आहेत. तसेच 79505 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आहे.
चंद्रपूर जिल्हा…आज पॉझिटिव्ह..२२८,एकूण पॉझिटिव्ह : १५२७७,एकूण मृत्यू : २२७,एकूण डिस्चार्ज…१२१९९
आज डिस्चार्ज : १५१