भंडारा:- शंभर वर्षाची संघर्ष आणि एकतेची गौरवशाली परंपरा असलेली देशाची पहिली राष्ट्रव्यापी कामगार संघटना आयटकच्या शताब्दी वर्षानिमित्त ध्वजारोहण करून अभिवादन करण्यात आले.31 ऑक्टोबर 020 ला आयटकचे जिल्हा कार्यालय राणा भवन भंडारा येथे लाल ध्वजाचे ध्वजारोहण आयटकचे जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके यांच्या हस्ते करण्यात आले.ध्वजारोहण समारंभाच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड धनराज झंजाळ होते तर प्रमुख पाहुणे किसान सभेचे अध्यक्ष कॉम्रेड सदानंद इमले,रतन मंत्री मानवाधिकार समिती उपाध्यक्ष होते.
या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक कॉम्रेड हिवराज उके यांनी या आयटक च्या 100 वर्षाचा गौरवशाली इतिहास सांगितला व कामगारांच्या हीत संरक्षणा सोबतच भारतीय संविधानाला अभिप्रेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य स्थापण्यासाठी आयटक कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच मोदी सरकारने कामगार विरोधी कामगार कायद्याचे कोडिफिकेशन परत घ्यावे अशी मागणी केली.
कार्यक्रमाचे संचालन कॉम्रेड गजानन पाचे यांनी केले तर आभार कॉम्रेड प्रितेश धारगावे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॉम्रेड वामनराव चांदेवार कॉम्रेड घनश्याम नागोसे ,कॉम्रेड अनिता भावसागर (मेश्राम )कॉम्रेड मनीषा गजभिये कॉम्रेड महादेव आंबाघरे, काॅ. दिलीप क्षीरसागर,काॅ. गौतम भोयर इत्यादीने सहकार्य केले. अशी माहिती कॉम्रेड हिवराज उके यांनी दिली.
गोंदियाः- गोंदिया येथे आयटक जिल्हाध्यक्ष काॅ हौसलाल रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाला मिलिंद गणवीर,रामचंद्र पाटिल,शेखर कनोजिया,आम्रकला डोंगरे,शत्रुघ्न लांजेवार,काॅं शालूताई कुथे, करूणा गणवीर उपस्थित होते.