गोंदिया: शहरातील सुभाष गार्डन कोरोनामुळे बंद आहे. राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने अनलॉक अंतर्गत गेल्या काही महिन्यांपासून सर्व क्रीडा शाळा, जिम, शिबिरे सुरू केली गेली आहेत त्यामुळे शहरातील एकमेव गार्डन असल्यामुळे त्यामध्ये वृद्ध आणि सामान्य नागरिक हे फिरण्यासाठी येत होते. पण गार्डन बंद असल्यामुळे सर्व नागरिकांनची गैरसोय होत आहे. ज्याप्रमाणे सर्व खेळांना जिम, व्यायामशाळा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे तशीच नगर परिषद प्रशासनाने सुभाष गार्डन सुरू करावे अशी मागणी नगर परिषदेचे सदस्य लोकेश यादव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.निवेदन देताना त्यांच्या सोबत नगर परिषदचे सदस्य पंकज यादव , धर्मेश अग्रवाल व अन्य सदस्य उपस्थित होते. यावर मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन सुभाष गार्डन सुरू करण्यात येईल असे त्यांनी चर्चेद्वारे सांगितले.