
भंडारा दि.27: नागपूर पदवीधर मतदार संघातील निवडणूकीसाठी 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान होणार असून मतदान केंद्र परिसरात 30 नोव्हेंबर 2020 ते 1 डिसेंबर रोजी 24 वाजेपर्यंत कलम 144 अंमलात राहणार आहे.
सर्व मतदान केंद्राचे 100 मीटर परिसरात कलम 144 लागू करण्यात आली असून कोणत्याही खासगी वा सार्वजनिक जागेमध्ये खालील प्रमाणे कृती करण्यास प्रतिबंध करण्याकरीता जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आदेश निर्गमित केले आहेत.
- मतदान केद्रापासुन 100 मीटर त्रिजेच्या परीसरात प्रचार करणे, बेकादाशीर जमाव करणे, हत्यार बाळगणे मतदारांना आमिष दाखविणे, मतदारांना मतदानापासून रोखणे, धुम्रपान करणे, ज्वलनशील पदार्थ नेणे.
- मतदान केंद्रापासून 100 मीटर त्रिजेच्या परिसरात कोणत्याही सार्वजनिक वा खासगी जागेमध्ये ध्वनीवर्धक किंवा ध्वनिक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो तसाच्या तसा ऐकवणारा उपकरणसंच वापरणे किंवा चालविणे.
- 100 मीटर प्रतिबंध त्रिजेच्या क्षेत्राचे बाहेरील भागावरुन ध्वनिक्षेपकांचा असा वापर करणे की, ज्यामुळे मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाचे कर्मचारी आणि मतदानासाठी येणारे मतदार यांना त्यांचे कर्तव्य पार पाडण्यामध्ये बाधा निर्माण होणार आहे.
- मतदार केंद्रपासून 100 मीटर त्रिजेच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे वाहन आणने.
- मतदारांना ने-आण करण्यासाठी अनधिकृतपणे वाहनाचा वापर करणे.
- मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरात राजकीय नेत्यांचे फोटो, चिन्ह, घोषणा करणे.
- मतदान केंद्रापासून 100 मीटर त्रिजेच्या परिसरात हॉटेल, टेलिफोन बुथ, झेरॉक्स मशिन, फेरीवाले यांनी व्यवसाय करणे.
सदरचा आदेश हा भंडारा जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राचे परिसरात 30 नोव्हेंबर 2020 रोजीचे स. 10 वाजेपासून ते 1 डिसेंबर 2020 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहील




