
गोंदिया,दि.०८- जिल्यातील गंगाझरी ग्राम पंचायत मध्ये करोडो रुपयांचा अपहार झाला आम्ही प्रशासनाकडे तक्रार करीत चौकशीची मागणी लावून धरली.जर आम्ही केलेले आरोप जर खोटे निघाल्यास आम्हाला खुशाल फासावर लटकवा अशी भूमिका गोंदिया तालुक्यातील गंगाझरी येथील आंदोलकांनी सोमवारी (दि.०८)गंगाझरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली आहे.
दरम्यान ग्राम पंचायतच्या चौकशी ची मागणीला घेऊन त्यांनी सोमवार (ता.8) पासून बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे.
दरम्यान ग्राम पंचायतच्या चौकशी ची मागणीला घेऊन त्यांनी सोमवार (ता.8) पासून बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे.
येथील गावकऱ्यांनी ग्राम पंचायत मध्ये झालेल्या गैरव्यवहाराची तक्रार महिन्याभऱ्या पुर्वी जिल्हा प्रशासनाकडे केली. दरम्यान येथील येथील पूर्व सरपंच सोनु घरडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ज्या गावकऱ्यांनी त्यांना पदावर बसविले त्या गावकऱ्यानाच अवार्च भाषेचा उपयोग करीत गावगुंड म्हणून उपयोग केला. यावेळी सदर सरपंच यांचा उपस्थित गावकऱ्यांनी निषेध व्यक्त केला. ग्राम पंचायत ची सर्व ठेकेदारी सरपंच सोनु घरडे हेच करतात. त्यामुळे त्यांनी अनेक कामात बोगस बिल लावून घोळ केला आहे असा आरोपही पत्रकार परिषदेतून करण्यात आला आहे. गावातील मयत नागरिकांना मोफत लाकडे देण्याचे नियोजन झाले होते.परंतु गावातील मयत झालेल्यासाठी लाकडे न देता है त्यांच्या नावे हजारो रुपयांची बिल काढण्यात आले.म्हणजेच सदर सरपंचाकडून टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.एवढेच नव्हे तर सामान्य फंडातून चढ्या दराने वस्तूंची खरेदी करून लाखो रुपयांच्या अपहार करण्यात आला असल्याची माहिती ही पत्रकार परिषदेतून केली आहे. भुखंड विक्री करून लाखों रुपये नागरिकांकडून वसूल करण्यात आले . याखेरीज यू.के.इलेक्ट्रॉनिक च्या नावे कोणतेही इ – टेंडर नसतानाही त्या नावे लाखो रुपयांचे बिल काढल्याचा पुरावाच पत्रकार परिषदेत सादर करण्यात आला.त्यामुळे सदर सरपंच गावकऱ्यांची किती फसवणूक करीत आहे यावरून सिद्ध होत आहे.तसेच सदर सरपंच स्वतः अपहार करीत असून तो स्वतःलाच क्लीन चिट देत आहे. पाच वर्षाचा जमाखर्चाचा हिशोब ग्राम सभेत गावकऱ्यासमोर सादर न करता तो पत्रकार परिषदेत मांडत आहे हा कोणत्या नियमात मोडतो?असा प्रश्नही यावेळी गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. ग्राम पंचायत संबंधात कोणतीही माहिती तसेच माहिती अधिकारात मागितलेली माहिती सुद्धा तो गावकऱ्यांना पुरवित नाही. ग्राम पंचायत चे एकूण नऊ सदस्य असतांना सुध्दा फक्त एकटा सरपंच पत्रकार परिषद घेत आहे. यावरूनच सदर सरपंच किती खालच्या पातळीचा आहे असा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. भुखंड विक्री, शोस खड्डे, व नाडेप टाकी, तसेच अंगणवाडी, शाळा दुरुस्तीच्या नावावर झालेला अपहार, साउंड सिस्टम व टीवी खरेदी, तसेच खुल्या बाजारातून झालेलेली वस्तू खरेदीत मोठी तफावत असल्याचा सर्व पुराव्यानिशी समोर पत्रकार परिषदेतून समोर आणला ही पुराव्या निशी समोर आणला.आम्ही केलेल्या आरोपांची अगोदर चौकशी करा. जर आम्ही केलेले आरोप निराधार असतील तर आम्हाला खुशाल फासावर लटकविण्यात यावे. अन्यथा अन्यथा सोनू घरडे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून मानहानीचा दावा करण्यात येईल अशी मागणी पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत हेमंत बघेले, सन्नी बघेले, रामसिंग पंधरे, नानाजी वाहने, छगन लिल्हारे, अर्जुन नागभिरे, गणपत टेकाम, योगेश पगरवार, सविता लिल्हारे, काजल पंधरे, जोशना युइके, मंजु बक्षरियाँ तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




