
वाशीम :मानोरा तालुक्यातील ग्राम म्हसनी येथे रेडिओ वत्सगुल्म ९०. ८ एफ. एम, स्मार्ट नवी दिल्ली व युनिसेफच्या ‘पोषण कि पोटली’ कार्यक्रमाअंतर्गत नेशनल मोबाईल मेडिकल युनिट,वाशीम सह पोषण आहारा संदर्भात मार्गदर्शन आणि मोफत औषधोपचार शिबीर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी ,मार्गदर्शन करतांना रेडिओ वत्सगुल्म चे इरफान सय्यद यांनी निरोगी आयुष्य जगायचे असेल तर पोषक आहार महत्वाचा आहे. विशेषतः कोरोनाच्या जागतिक महामारीत प्रत्येकाने आपली रोग प्रतिकार शक्ती वाढविण्या करिता पालेभाज्या, फळ, दूध, अंडी, मास, व व्हिटॅमिन ‘सी’ युक्त पदार्थाचे सेवन करावे असं आवाहन केले.
शिबिरा मध्ये नेशनल मोबाईल मेडिकल युनिट द्वारे गावातील गरोदर माता, स्तनदा माता, कुपोषित बालकं व इतर रुग्णांना तपासून मोफत औषधोपचार करण्यात आले.
रेडिओ वत्सगुल्मचे केंद्र प्रमुख अमोल देशमुख यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील इतर गावांमध्येही पोषण कि पोटली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी आर.जे.देव इंगोले, समीर शेख,आणि मोबाईल मेडिकल युनिटच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनिया भोणे, फार्मसिस्ट तौसिफ़ खान,सीमा कांबळे,सुखदेव काळबांडे आणि राजू हजारे यांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशश्वी करण्या साठी गावातील आशा ताई आणि अंगणवाडी सेविका यांनी परिश्रम घेतले .





