33.9 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ जगत महाविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय एड्स सप्ताहाचे आयोजन

जगत महाविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय एड्स सप्ताहाचे आयोजन

0
182

blank

गोरेगाव – स्थानिक जगत, कला, वाणिज्य व इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालय गोरेगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आंतरराष्ट्रीय एड्स सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे .या सप्ताहातंर्गत जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रमाचे महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.एन. वाय. लंजे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी ग्रामीण रूग्णालय गोरेगावच्या समुपदेशीका डाॅ.सुनंदा वैरागडे,डाॅ.प्रज्ञा भालेराव , रा.से.यो .विभागप्रमुख डाॅ.जे. बी. बघेले,डाॅ.आर .एम .गहाणे प्रामुख्याने विचारमंचावर उपस्थित होते . कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व शारदा माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली.कार्यक्रमाचे औचित्य साधून डाॅ.सुनंदा वैरागडेनी समयोचित विचार प्रकट केले .कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ. एन.वाय.लंजे यांनी मार्गदर्शन करतांना संयम पाळा-एड्स टाळा असा मौलिक सल्ला दिला.या कार्यक्रमाचे संचालन डाॅ.आर.एम.गहाणे यांनी केले तर आभार डाॅ.विजय रहांगडाले यांनी मानले .या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .

blank