34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ गोंदिया जिल्ह्यात 24 नवे रुग्ण,एकाचा मृत्यू

गोंदिया जिल्ह्यात 24 नवे रुग्ण,एकाचा मृत्यू

0
132

blank

गोंदिया,दि.14 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 14 डिसेंबर रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 24 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. 83 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली.1 रुग्णांचा मृत्यू झाला.  आजपर्यंत 13117 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 12616  रूग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रूग्णांची संख्या 327 आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 94.90टक्के आहे. बाधीत रुग्णांचा मृत्यु दर हा 1.24 टक्के आहे. जिल्ह्यातील 174 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला.

blank