31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ देशमुख कुटुंबियांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

देशमुख कुटुंबियांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

0
34

blank

वाशिम, दि. 19 : येथील रेखाताई राष्ट्रीय विद्यालय, जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व नगरपरिषद महात्मा गांधी विद्यालयातील गरीब, गरजू, अल्पसंख्याक तसेच बेघर कुटुंबातील मुला-मुलींना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दिलीप देशमुख यांचे सुपुत्र दुर्गेश देशमुख यांच्या हस्ते १७ डिसेंबर रोजी वह्यांचे वाटप करण्यात आले.

रेखाताई राष्ट्रीय विद्यालय येथे आयोजित या कार्यक्रमात सुमारे १५० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत म्हणून मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. दुर्गेश देशमुख यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. पी. देशपांडे, प्राचार्य श्री. भालेराव, विधी सेवक बाबाराव घुगे, मोतीराम खडसे व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

blank