40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ फुले दांपत्य दृष्टे शिक्षणतज्ञ होते-कॉम्रेड हिवराज उके 

फुले दांपत्य दृष्टे शिक्षणतज्ञ होते-कॉम्रेड हिवराज उके 

0
44

blank

भंडारा -:  ज्या काळात स्त्रिया व शूद्रांना शिक्षण नाकारले जात होते त्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चांगल्या प्रकारे शिकवता येण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता ज्यांना जाणवली ते फुले दांपत्य निश्चितच शिक्षण तज्ञ होते असे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव व माजी नगरसेवक कॉम्रेड हिवराज उके यांनी व्यक्त केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 190 व्या जयंती दिनानिमित्त भाकप कार्यालय कॉम्रेड राणा भवन भंडारा येथे दिनांक 3 जानेवारी 2021 ला सकाळी 10:30 वाजता अभिवादन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी कॉम्रेड हिवराज उके प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी महिला कार्यकर्त्या फुलवंती टिकापाचे होत्या तर प्रमुख पाहुणे किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सदानंद इलमे व  श्रीमती छबी पाचे होत्या .  याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन “महिला शिक्षण दिन* म्हणून घोषित केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करताना कॉम्रेड हिवराज उके म्हणाले ज्या समाजातून व ज्या परिस्थितीतून मुली अगर मुले येतात त्याचा बरा वाईट परिणाम संबंधित मुला-मुलींच्या शिक्षणावर होत असतो हा सावित्रीबाईंनी सण 1853 मध्ये मांडलेला सिद्धांत सर्वमान्य झाला.
सावित्रीबाई फुले स्वतः व त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांचे शिकवणे उत्कृष्ट व मनापासून चे असूनही चाचणीत जेव्हा श्रीमंत व ब्राह्मण मुलींच्या शाळेची प्रगती अधिक आहे असे दिसून आले तेव्हा त्यांनी हा सिद्धांत मांडला. यापुढे आपल्या शाळांमधल्या शिक्षिका प्रशिक्षित असल्या पाहिजेत म्हणून सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबानी एक नॉर्मल स्कूल काढले असेही कॉम्रेड हिवराज उके यांनी सांगितले . संचालन भाकपचे तालुका सचिव कॉम्रेड गजानन पाचेे यांनी केले तर आभार  कॉम्रेड देविदास कानेकर यांनी मानले.  याप्रसंगी कामरेड वामनराव चांदेवार, कॉम्रेड श्रीवंता अंबुले ,सौरभ नागोसे, दिलीप शिरसागर ,गोपाल चोपकर, घनश्याम नागोसे इत्यादींचे सहकार्य लाभले.

blank