
गोंदिया,-शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 5 जानेवारी रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 34 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 39कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली.तर एका 64वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला.
आजपर्यंत 13,781 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 13,354रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 248 आहे. 115 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 179रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 96.98 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.20 टक्के आहे तर डब्लिंग रेट 226.4 दिवस आहे.




