
आरमोरी,दि.10 :- गडचिरोली येथील सुप्रभात मंगल कार्यालय येथे राष्ट्रीय तेली समाज मॅरेज ब्युरोच्या वतीने राज्यस्तरीय तेली समाज वधु – वर पालक परिचय मेळावाचे आयोजन करण्यात आले आहे. तेली समजतील लोकांना एकत्रित करून यांचाशी संवाद साधून त्यांचा वेळ आणि पैशाची बचत व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय तेली समाज मॅरेज ब्युरो चे व्यवस्थापक द्वारकप्रसाद सातपुते यांच्या सौजन्याने दिनांक १७/०१/२०२१ रोज रविवारी सकाळी ११.०० वाजता राज्यस्तरीय तेली समाज वधु वर पालक परीचय मेळावा आयोजन गडचिरोली येथील सुप्रभात मंगल कार्यालयात आयोजित केला आहे. राज्यस्तरीय तेली समाज वधु- वर पालक परीचय मेळावा चे नोंदणी सोशल मीडिया वेबसाईट अप्प rashtriyatelisamaj. com व wadhuwar अप्प च्या माध्यमातून करत आहेत. वधु वर नोंदणी रजिस्टर लिंक https://wadhuwar. com रजिस्टर करण्यात आलेल्या वधु वर ला परीचय मेळाव्याचे E Books स्मरणिका मध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे.
तेली समाज बांधव वधु- वर तेली समाज वधु- वर पालक परीचय मेळाव्यात नोंदणी करून मोठया संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून भाग्यवानजी खोब्रागडे, देवरावजी भांडेकर, प्रभाकरजी वासेकर, योगिता प्रमोद जी पिपरे , योगिता भांडेकर, बाबुरावजी कोहळे , देवानंद कामडी, देवाजी डोनुजी सोनटक्के, सुरेश भांडेकर, तुलसीदास कुनघाडकर, रमेश बरसागडे, डॉ सत्यविजय दुधबडे, गजानन भांडेकर, विनोद खोबे,अनिल कोठारे,राहुल नैताम, भगवान जी ठाकरे, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत .
राज्यस्तरीय तेली समाज वधु वर पालक परिचय मेळावा यशस्वी करण्यासाठी रुपेश किरमे, सुनील जुआरे, किशोर गव्हारे, पुरुषोत्तम बोदलकर, उमेश कुनघाडकर , राकेश चिचघरे , प्रशांत चलाक, अतुल भांडेकर, तुळशीदास भुरसे, भाऊराव कोठारे, यशवंत भांडेकर, पितांबर कुकडकर, घनश्याम लाकडे आदी भरीव मदत करीत आहेत. तेव्हा तेली समाजातील बांधवांनी याचा फायदा घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन द्वारकाप्रसाद सातपुते व इतर सहकारी यांनी केले आहे.




