
गोंदिया:- मेडीकल अशोसिएशन ऑफ इलेक्ट्रो-होम्योपॅथी जिल्हा गोंदियाच्या वतीने 11 जानेवारीला मांडोदेवी देवस्थान तेढा येथे डॉ काऊंट सिझर मॅटी यांची 212 वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एमईएच संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ के.जी.तुरकर होते.तर प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ.अमित खोडनकर तालुका वैद्यकिय अधिकारी आमगाव/सालेकसा,डॉ संतोष येवले सचीव एमएईएच जिल्हा गोंदिया,डॉ राजेश तिवारी कोषाध्यक्ष एमएईएच जिल्हा गोंदिया, डॉ.के.बी राणे महासचीव,डॉ.आर.टी.चौधरी संघटक,डॉ.सि.एच.भगत तालुकाध्यक्ष तिरोड़ा,डॉ. बी.ए.बावनकुले कार्याध्यक्ष हे प्रामुख्याने उपस्थित होते.
जंयती निमित्त डॉ अमीत खोडनकर यांनी सांगीतले की आपल्या इलेक्ट्रो-होम्योपॅथी वर विश्वास ठेऊन आपल्या पॅथी मध्ये उपचार करा ; चांगले संशोधन करा तरच आपली पॅथी नक्कीच एक दिवस राजपत्रीत होईल. त्याचप्रमाणे अध्यक्षीय स्थानातुन डॉ के जी तुरकर यांनी इलेक्ट्रो-होम्योपॅथी च्या आजच्या घडामोडीवर मार्गदर्शन केले व संघटना च्या कार्यावर भर दिले.
प्रास्ताविक डॉ संतोष येवले यांनी केले तर मंचसंचालन डॉ योगेश हरीणखेड़े व आभार डॉ सि एच भगत यांनी मानले.
कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरीता डॉ सुर्यवंशी ; डॉ गणेश बिसेन ; डॉ डोये; डॉ दिपक बाहेकार डॉ यादेश्वर अंबुले ; डॉ प्रशांत बोंबार्डे ;डॉ यु बी शरणागत ; डॉ टेंभरे ; श्री कृष्ना पटले ; श्री येले यांनी अथक परीश्रम घेतले.कार्यक्रमात गोंदिया जिल्हातिल ईएच वैद्यकिय व्यवसायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



