29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ भंडारा जिल्ह्यात आज 23 डिस्चार्ज,गोंदिया जिल्ह्यात 17 डिस्चार्ज

भंडारा जिल्ह्यात आज 23 डिस्चार्ज,गोंदिया जिल्ह्यात 17 डिस्चार्ज

0
81

blank

गोंदिया/भंडारा दि. 19 : जिल्ह्यात आज 23 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 12420 झाली असून आज 15 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 13018 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.41 टक्के आहे.गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 19 जानेवारी रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 16 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली.

गोंदिया जिल्ह्यात आजपर्यंत 14,053 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 13,703 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 169 आहे. 77 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 181 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 96.85 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.20 टक्के आहे तर डब्लिंग रेट 226.4 दिवस आहे.

  भंडारा जिल्ह्यात  आज 378 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 15 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 1 लाख 13 हजार 141 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 13018 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 07, मोहाडी 00, तुमसर 02, पवनी 02, लाखनी 01, साकोली 03 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 12420 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 13018 झाली असून 281 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 317 झाली आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.41 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.41 टक्के एवढा आहे.

blank