33.9 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ रेल्वे बोर्डाने गोंदियाला दिली दोन नवीन गाड्यांची भेट

रेल्वे बोर्डाने गोंदियाला दिली दोन नवीन गाड्यांची भेट

0
958

blank

गोंदिया : रेल्वे बोर्डाद्वारे गोंदियाच्या प्रवाश्यांना दोन नवीन गाड्यांची भेट दिली आहे. ही माहिती रेल्वे बोर्डाचे डेप्युटी डायरेक्टर विवेककुमार सिन्हा यांनी डेली रेल्वे मुवर्स असोसिएशनचे (ड्रामा) अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांना दिली.
या दोन गाड्यांपैकी एक मध्य प्रदेशच्या रीवा येथून दररोज सायंकाळी 5.20 वाजता सुटेल. जबलपूर-नैनपूर-बालाघाट होत सकाळी 5.15 वाजता गोंदियाला पोहचेल. सकाळी 7.25 वाजता इतवारी स्थानकावर जावून समाप्त होईल. याच प्रकारे ही गाडी इतवारीवरुण सायंकाळी 6.30 वाजता सुटेल व रात्री 9.15 वाजता गोंदियाला पोहचेल. सदर मार्गाने रात्री 4 वाजता जबलपूर व सकाळी 7.30 वाजता रीवा पोहचेल.

दुसरी गाडी दररोज सकाळी 5.15 वाजता जबलपूरवरुन सुटेल. ती बालाघाट होत सकाळी 10.30 वाजता गोंदिया तथा दुपारी 1.50 वाजता चांदाफोर्टला पोहचेल. या गाडीचा परतीचा प्रवास दुपारी 2.50 वाजता चांदाफोर्टवरून होईल. सायंकाळी 6 वाजता गोंदिया व त्यानंतर बालाघाटवरून रात्री 11.15 वाजता जबलपूरला पोहचेल. डेली रेल्वे मुवर्स असोसिएशनने रेल्वे बोर्डाचे आभार मानले.

संघटनेचे सचिव अशोक शर्मा, जितेंद्र परमार, प्रसाद नायडु, प्रकाश तिडके, राजेश बंसोड़, सुब्रत पाल, रेलवे कमिटी सदस्य रितेश अग्रवाल, छैलबिहारी अग्रवाल, प्रो.मेहबूब हिरानी, पुरूषोत्तम हिरानी, पुरूषोत्तम अग्रवाल, विष्णु शर्मा यांनी गया-चेन्नई एक्सप्रेस नंतर या दोन गाड्यांची भेट मिळाल्याबद्दल रेल्वे बोर्डाचे आभार मानले. तसेच या मार्गावर पॅसेंजर गाडी सुरू करण्याची मागणी केली आहे.

नवीन गाडी रीवा-नागपूरमध्ये 20 बोगीत फस्ट एसी, सेकंड एसी, थर्ड एसी याशिवाय 8 बोगी स्लीपर व जनरलचे राहतील. जबलपुर-चांदाफोर्ट गाडीत 6 चेयर कार, 2 एसी चेयर कार असे 16 बोगी राहतील.

blank