
गोंदिया,दि.26ःस्थानिक शास्त्री वार्ड निवासी दिपेश महेन्द्र सोनेवाने यांना “ एशिया बुक ऑफ रेकार्ड ” च्या एवार्ड ने सन्मानित करण्यात आले . हे एवार्ड त्यांना त्यांच्या पेन्सिल च्या लिडवर मायक्रो आर्ट मुळे मिळाले . २०२० ला दिपेश ला “ इंडिया बुक ऑफ रेकार्ड ” च्या एवार्डनेही सन्मानित करण्यात आले होते. आता नविन वर्षाच्या सुरुवातीलाच त्याला “ एशिया बुक ऑफ रेकार्ड ” चा अवार्ड मिळाला आहे .
दिपेश सोनेवाने यांनी आतापर्यंत खुप सारे पेन्सिल च्या लिडवर मायक्रो आर्टच्या माध्यमातून निरनिराळ्या कलाकृती तयार केलेल्या आहेत.त्यात अनेक प्रकारचे नाव लिहिणे,सिंबाल्स तयार करणे, महान थोर पुरुषांच्या मुर्त्या तयार करणे,दुर्गा देवीची प्रतिकृती,पतंग धागा, शिवपिंड इत्यादी अनेक प्रकारच्या कलाकृती पेन्सिल च्या लिडवर तयार केले आहे.त्यातूनच त्याला एका कलाकृतीसाठी “ एशिया बुक ऑफ रेकार्ड ” चा अवार्ड मिळाला आहे.जे जगातील नविन सात आश्चर्याच्या वास्तू आहेत त्या सातही वास्तूंना दिपेशने एकाच पेन्सिलच्या लिडवर तयार केले आहे .
त्यात ताजमहल,चीनची भिंत,किस्तो रेदेंतोर, पेट्रा,कलोसियम,माक्सू पिक्त्सू,चिचेन इत्सा अशा सात वास्तूंचा समावेश करण्यात आला .
जगातील सर्वात मोठा म्हणजे ५९७ फुट उंच स्टॅच्यू वल्लभभाई पटेल यांचा “ द स्टॅच्यू ऑफ युनिटी ” याला जगातील सर्वात लहान उंचीचा म्हणजे ०.७ से.मी. स्टॅच्यू पेन्सिल च्या लिडवर तयार करुन एक वेगळा रेकार्ड तयार करण्यात आला .या अवार्डचे ओपनिंग गोंदिया जिल्हयाचे अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले व सोबत महिला बालविकास विभागाचे विस्तार अधिकारी विनोदकुमार चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.दिपेश सोनेवाने यांनी या यशाचे श्रेय आपल्या आई – वडिलांना व बहिणिना दिले.जयंत मुरकूटे , रतीराम भांडारकर , मंगेष सोनेवाने , श्रृति सोनेवाने , स्नेहल सोनेवाने , श्रीकांत चुटे , अनिता मुरकूटे , संतोष भांडारकर , संजय आसटकर , रुपचंद रामटेककर , जयेश मुरकूटे , संतोष भांडारकर , भोजराज रणदिवे , दिनेश रामटेककर , संजय मुरकूटे , मनोज सोनेवाने , सुनिल तिवारी , राजेश कापसे , राजकुमार कुथे , शैलेश निकोडे , रेवाराम सोनवाने इत्यादींनी त्याचे खुप खुप अभिनंदन केले.तसेच या उत्साहात त्याचे मित्र नातेवाईक या सर्वानी त्याचे कौतूक जात आहे.




