39.2 C
Gondiā
Wednesday, June 10, 2026
Home Top News बाेदलकसा जलाशयात डोंगा पलटून बरबसपुरा येथील २ ठार….

बाेदलकसा जलाशयात डोंगा पलटून बरबसपुरा येथील २ ठार….

0
318

गोंदिया,दि.१०ः जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात असलेल्या बोदलकसा जलाशयात आज (दि.१०)पर्यटनाकरीता गेलेल्या ९ युवकांचा डोंगा उलटून २ युवक ठार झाल्याची घटना घडली आहे.मोहित वसंत रहांगडाले व  कुणाल शालिकराम भोंडे रा.बरबसपुरा ता.तिरोडा यांचा मृतामध्ये समावेश आहे.फिरायला गेलेल्यामध्ये अक्षय नरेंद्र बिसेन,राकेश राधेशाम लाडे, निखिल इंदल पटले,लक्की संजय रहांगडाले,प्रलय राधेशाम पारधी, मनीष रमेश कोकूडे
व अविनाश श्रावण टेकाम सर्व राहणार बरबसपुरा ता.तिरोडा यांचाही समावेश होता.हे सर्व ९ ही युवक मच्छिमाराच्या डोंग्याने जलाशयत गेले होते़.अचानक तोल गेल्याने पाण्यात बुडाले.घटनेची माहिती मिळताच आमदार विजय रहागंडाले ,जिल्हा परिषद सदस्य जगदिश बावनथडे ,शैलेष नंंदेश्वर  माजी जि प सदस्या मदन पटले, तिरोड्याचे पोलीस निरीक्षक  यांनी घटनास्थळी धाव घेतली.आपत्ती व्यवस्थापन व तिरोडा पोलीस विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून शोध मोहिम सुरु आहे.