33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ पी.डी.राहांगडाले विद्यालयात प्रजासत्ताक दिनी गुणवंत विद्यार्थ्यांचा व कोरोना योध्दांचा सत्कार

पी.डी.राहांगडाले विद्यालयात प्रजासत्ताक दिनी गुणवंत विद्यार्थ्यांचा व कोरोना योध्दांचा सत्कार

0
49

blank

गोरेगाव —पी.डी.राहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव येथे प्रजासत्ताक दिनी गुणवंत विद्यार्थी व कोरोना योध्दा यांचा सत्कार करण्यात आला.दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणानुक्रमे चार गुणवंत विद्यार्थ्यांचे डॉ.ग्यानीरामभाऊ देशमुख मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट गोरेगाव ,स्व.अनंदाबाई फगलाल बघेले स्मृतीपुरस्कार ,निर्मल काॅम्पुंटर गोरेगाव तर्फे पुरस्कार,आयसेक्ट काॅम्पुंटर गोरेगाव तर्फे पुरस्कार, देवून विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच कोरोना काळात माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रमात नगर पंचायत गोरेगाव येथे घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी व जनजागृती केली अशा शाळेतील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या दिनानिमित्ताने शाळेत ध्वजारोहण करण्यात आले .तसेच कार्यक्रम पार पाडताना कोवीड-19 चे सर्व नियम पाळण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी.एफ.बघेले माजी प्राचार्य हे होते.तर मा.डाॅ.टी पी.येळे अध्यक्ष ग्रामहीता शिक्षण संस्था यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.हि.दा.येळे,बी.डी.पटले,तुमेरसिंग बघेले, विद्यार्थी व पालक ,शाळेचे मुख्याध्यापक सी.डी. मोरघडे, व सर्व शिक्षक व शिक्षकेतर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सी.आर.बिसेन व सौ.एम.डी.राहांगडाले तर आभार प्रदर्शन ए.एच.कटरे यांनी केले.

blank