38.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News विसर्जन करताना दोघा भावांचा बुडून मृत्यू

विसर्जन करताना दोघा भावांचा बुडून मृत्यू

0
28

सांगली दि.२१:: येथील बायपास पुलाखाली कृष्णा नदीत गणपती विसर्जन करताना दादूनाथ सुरेश जाधव (वय 32) व भैरवनाथ शिवाजी जाधव (वय 35, प्रकाशनगर, तिसरी गल्ली, सांगली) या सख्ख्या चुलतभावांचा बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने गणेशभक्तांतून हळहळ व्यक्त करण्यात आली.

याबाबत माहिती अशी, दादूनाथ आणि भैरवनाथ हे दोघे सख्खे चुलत भाऊ आहेत. दोघेही वसंतदादा पाटील औद्योगिक वसाहतीमध्ये युनायटेड पेंटस्‌ या रंग बनवणाऱ्या कारखान्यात काम करतात. आज सकाळी मावशीच्या पतीने निधन झाल्यामुळे दोघांनी घरगुती गणपतीचे तत्काळ विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. कारखान्यातून रजा मागून दोघेही घरी आले.

blank