बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया कालवश

0
9

कोलकाता- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष (बीसीसीआय) जगमोहन दालमिया यांचे रविवारी रात्री ९.१५ वाजता निधन झाले. ते काही दिवसांपासून आजारी होते. ७५ वर्षीय दालमियांना गुरुवारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.जगमोहन दालमिया
जन्म : ३० मे १९४०, कोलकाता
टोपणनाव : डॉलरमिया. पैसा जोडणारा माणूस
अशी क्रिकेटविश्वात प्रतिमा.
-इंद्रजितसिंग बिंद्रा यांनी दालमिया यांना १९७९ ला क्रिकेटमध्ये आणले.
-भारतात १९९६ मध्ये वर्ल्डकप आयोजनात दालमियांचे मोठे योगदान.
-१९९७ मध्ये आयसीसीचे अध्यक्ष बनले.
-२००१ मध्ये बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान.
-२ मार्च २०१५ पासून पुन्हा बीसीसीआयचे अध्यक्ष.