काँग्रेस म्हणजे RSS नव्हे – राहुल गांधी

0
6

वृत्तसंस्था
मथुरा, दि. २१ – काँग्रेसची विचारधारा RSS सारखी नाही, तिथे मोहन भागवतांनी म्हटलं की आकाश काऴ्या रंगाचं आहे तर सर्वजण माना डोलावतात अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीनी संघाच्या एकछत्री नेतृत्वावर हल्ला चढवला. काँग्रेस हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून इथे प्रत्येकाची वेगळी विचारधारा आहे आणि पटो वा न पटो इथे प्रत्येकाचे विचार स्वीकारले जातात, असेही ते म्हणाले. मथुरा येथे काँग्रेसच्या चिंतन शिबीरात ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
याआधी मी काँग्रेसला एखादी सेना व कार्यकर्त्यांना जवान समजत होतो, पण आता माझी विचारधारा बदलली आहे, मी प्रत्येक कार्यकर्त्याला माझं कुटुब मानतो आणि कुटुंबातील व्यक्तीला कधीही बाहेर काढलं जात नाही. इथे उपस्थित प्रत्येक कार्यकर्त्याच्या डीएनएमध्ये काँग्रेस आहे असेही ते म्हणाले.