43.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News धानोरा तालुक्यात आढळले नक्षल बॅनर

धानोरा तालुक्यात आढळले नक्षल बॅनर

0
25

blank

गडचिरोली दि.२१: नक्षलवाद्यांनी धानोरानजीक बॅनर बांधले असून, त्यात माओवादी कम्युनिस्ट पार्टीचा स्थापना सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केले आहे. दोन बॅनर धानोरा शहरापासून एक किलोमीटर अंतरावर बांधण्यात आल्याने आता नक्षलवादी पोलिसांची मोठी कुमक तैनात असलेल्या शहरातही शिरकाव करु लागल्याचे दिसून येत आहे.
२१ सप्टेंबर रोजी माओवादी कम्युनिस्ट पार्टीचा स्थापना दिवस असतो. दरवर्षी नक्षलवादी हा दिवस साजरा करतात. परंतु यंदा त्यांनी बॅनर बांधून थेट नागरिकांनाच स्थापना दिवस व सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केले आहे. कालच अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे बॅनर बांधल्याचे दिसून आले. आता धानोरा तालुक्यातही बॅनर झळकू लागले आहेत. धानोरा तालुकास्थळापासून १ किलोमीटर अंतरावर व धानोरा-गडचिरोली या मुख्य मार्गावर असलेल्या कन्हारटोला येथील नदीच्या पुलावर बॅनर आढळून आले. शिवाय हेटी येथेही बॅनर बांधल्याचे दिसले. मुरुमगावनजीकच्या बेलगाव येथेही बॅनर बांधण्यात आले आहे.

blank