40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ भाजपा कार्यकर्त्यानी फेेकले OBC प्रवर्गाचे झेंडे,दुप्पटे व जनगणना मागणीचे फलक,पालकमंत्र्यांना तक्रार

भाजपा कार्यकर्त्यानी फेेकले OBC प्रवर्गाचे झेंडे,दुप्पटे व जनगणना मागणीचे फलक,पालकमंत्र्यांना तक्रार

0
404

blank

भंडारा,दि.28ः- भंडारा येथील सामान्य रुग्णालयातील जळीत हत्याकांडातील दोषींना शिक्षा व इतर मुद्यांना घेऊन 25 जानेवारी रोजी भारतीय जनता पक्षाच्यावतीने आयोजित मोर्च्यात सहभागी होण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणविस आले होते.भाजपचा हा मोर्चा जात असतानाचा ओबीसींच्या संविधानिक मागण्यांसाठी रात्रदिवस काम करीत असलेल्या युथ फॉर सोशल जस्टिस (YSJ) या सामजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्च्यातही ओबीसींचीच संख्या अधिक असल्याने त्यांनाही जनगणनेचा विषय कळावा यासाठी बसस्थानक परिसरातील नाल्याकाठी ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना व्हावी अश्या स्वरूपाची फलक घेवून उभे होते.त्यांचे हे फलक मोर्च्यातील अनेकांचे लक्ष वेधून घेत होते.मात्र या मोर्च्यातील काही असमाजिक तत्व असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी व भंडारा भाजपा तालुकाध्यक्षांनी शांतीपुर्वक पध्दतीने युथ फॉर सोशल जस्टिस (YSJ) या सामाजिक संघटनेचे वतीने युवक ओबिसी जनगणनासंबंधी फलक घेवून माजी मुख्यमंत्रीचे लक्ष वेधून घेण्यासाठी उभे असताना जनजागृती करणाऱ्या युवकांच्या अंगावर येवून जोरजबरीने हातातील फलक व झेन्डे, दुप्पटे, बॅनर हातात घेत लगतच्या नाल्यात फेकले.सोबतच राजकीय दबावातून पोलिसांना बोलावून या युवकांचा काहीही दोष नसतांना त्यांना नजरबंद करायला लावल्याने भाजपच्या या कृत्याचा सर्वत्र निषेध नोंदवला जाऊ लागला आहे.blank

विरोध करणारे ओबिसी प्रवर्गातीलच असल्याने सामान्य ओबिसी बांधवानी या नेत्याचा जाहिर निषेध करुन २६ जानेवारी रोजी पालकमंत्री यांच्या जनता दरबारात तक्रार केली.पालकमंत्री विश्वजित कदम यांनी दखल घेवून संबंधित विभागाला कार्यवाही करण्याचा आदेश दिले आहे. जिल्ह्यात सदर घटनेचे तिव्र प्रतिसाद उमटले असून दोषीवर कार्यवाही करण्यात यावी याकरिता अनेक ओबीसी संघटना एकत्रित आले आहेत.युथ फॉर सोशल जस्टिस (YSJ)चे जिल्हाअध्यक्ष प्रमोद केसलकर,हितेश राखडे,अविनाश खोब्रागडे,शुशांत नागदेवे,प्रतिक गजभिए,कुणाल पुडके,विशाल राखडे,योगेश बोरकर ,योगेश शेन्डे,शुभम मडावी,स्वप्नील मेश्राम ,पंकज पडोळे सह इतर कार्यकर्त्यांनी कारवाई न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा दिला आहे.

blank