31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ स्मार्टग्राम ग्रामपंचायत सिरेगावबांधचे नाविन्यपूर्ण उपक्रम सरपंच दादा संग्रामेंच्या हस्ते लोकार्पण

स्मार्टग्राम ग्रामपंचायत सिरेगावबांधचे नाविन्यपूर्ण उपक्रम सरपंच दादा संग्रामेंच्या हस्ते लोकार्पण

0
39

blank

अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे)-तालुक्याचे भूषण ठरलेली, शासनाचे अनेक पुरस्कार प्राप्त, स्मार्ट ग्राम ग्रामपंचायत शिरेगाव बांध लोकहिताचे अनेक निर्णय घेऊन आदर्श ग्रामपंचायत ठरण्याच्या मार्गावर आहे.या ग्रामपंचायतला लाभलेले युवा नेतृत्व सरपंच हेमकृष्ण संग्रामे ज्यांना आवडीने जनता दादा म्हणून संबोधते.सरपंच दादा संग्रामे यांच्या ग्रामपंचायत मार्फत घेतलेल्या लोकहिताच्या नवीन्य पूर्ण उपक्रमांचे तालुक्यात कौतुक होत आहे. या आदर्श ग्रामपंचायत च्या वतीने गावात स्वच्छता नांदावी म्हणून प्रती कुटुंब 2 कचरा पेट्या देण्यात आल्या.यात ओला कचरा व सुखा कचरा अश्या दोन प्रकारच्या कचरा पेट्याचा समावेश आहे.
गावात मुलींचा जन्मदर वाढावा या उद्देशाने ग्रामपंचायतणे गावातील ज्या कुटुंबामध्ये मुलींच्या जन्म झाला अशा कुटुंबांना दोन हजार रुपये अनुदान फिक्स डिपॉझिट च्या रुपाने मुलींचे नावे वीस वर्षासाठी जमा करण्यात आला.यामध्ये शिल्पा श्यामसुंदर वाघाये व अश्विनी राकेश मरस्‍कोले यांना हा लाभ देण्यात आला.दरवर्षी ग्रामपंचायत तर्फे देण्यात येणारा ग्रामरत्न हा पुरस्कार राजीराम कापगते यांना देण्यात आला.शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते.गावातील दहावी व बारावी मध्ये 75 टक्के पेक्षा जास्त गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक हजार रुपयांचा धनादेश ,प्रशस्तीपत्र देण्यात आले.यामध्ये दहाव्या वर्गाचे 7
आणि 12 चा 1,अश्या 8 विद्यार्थ्यांचा समावेश होता. 2019-20 या सत्रात पाचव्या वर्गातील कुमारी क्रेजा हेमकृष्ण संग्रामे हिने शिष्यवृत्ती पात्रता परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल एक हजार रुपयांचा धनादेश व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.याच विद्यार्थिनीने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यश प्राप्त केला. गुणवंत विद्यार्थी म्हणून तिचा गौरव करण्यात आला.यावेळी उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, सचिव आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

blank