
तिरोडा,दि.05:- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जनतेला सहन करावा लागला आपल्या मोलमजुरी ते व्यवसायाला व उपासमारीची वेळ आली असून अशा परीस्थितीत महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीने ७५ लक्ष विज ग्राह्कांना विद्युत कनेक्शन कापण्याचे नोटीस पाठवून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याच्ये पाप महाविकासआघाडी सरकारने केले आहे त्यामुळे विद्युत ग्राहकांचा होत असलेला छळ लगेच थांबविण्यात यावा व कोव्हीड काळातील विजबिल माफ करून दिलेले विज कापणीचे नोटीस परत घेण्यात यावा या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी तिरोडातर्फे तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयासमोर टाळा ठोको आंदोलन केले असून या आंदोलनामध्ये भाजप जिल्हा महामंत्री मदन पटले, न.प.तिरोडा येथील नगराध्यक्षा सोनाली देशपांडे,कृ.ऊ.बा.स.सभापती चिंतामण रहांगडाले, उपसभापती विजय डिंकवार, मा.सभापती डॉ.वसंत भगत,भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, शहरअध्यक्ष, स्वानंद पारधी,महिला मोर्चा अध्यक्ष माधुरी रहांगडाले, न.प.सदस्य राजेश गुनेरीया मा.सदस्य डॉ.बी.एस.रहांगडाले पवन पटले, लादेन रहांगडाले, भाजप महामंत्री,श्री तेजराम चव्हाण,दिगंबर धोके, कोषाध्यक्ष डॉ.रामप्रकाश पटले, प्रसिद्धी व संपर्क तालुका प्रमुख तिरूपती राणे,किसान आघाडी अध्यक्ष नितीन पारधी, विजयकाका ग्यानचंदानी कृउबास संचालक पिंटू रहांगडाले, दिपक पटले,जयप्रकाश गौतम, ओबीसी आघाडी अध्यक्ष डीलेश पारधी, युवा मोर्चा शहरअध्यक्ष अमोल तितिरमारे,प्रकाश सोनकवडे,मक्रम लिल्हारे, मिनाक्षी ठाकरे, शिवलाल परिहार, सरपंच गुलाब कटरे, तुमेश्वरी बघेले, महादेव कतनकर, बसंत नागपूरे, रवी मुटकुरे व मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
अर्जुनी मोर. :- कोरोणा काळात आलेले अवाढव्य वीज बिल व सध्या सुरू असलेले वीज कनेक्शन कपातीचे धोरण या शासनाच्या विघातक कृतीचा निषेध करून सध्याच्या राज्य शासनाच्या राजवटीतील अंधार दूर करण्यासाठी भारतीय जनता पार्टी तालुका अर्जुनी मोरगावच्या वतीने वीज वितरण कार्यालयावर माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचे नेतृत्वात हल्ला बोल आंदोलन करण्यात आले. यावेळी वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता अमित शहारे यांना निवेदन सादर करण्यात आले.यावेळी तालुका भाजपा अध्यक्ष अरविंद शिवणकर, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य रचना गहाणे, जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर, सडक अर्जुनी तालुका महामंत्री गिरधर हत्तीमारे,रघुनाथ लांजेवार, केवळराम पुस्तोडे, डॉक्टर गजानन डोंगरवार, तालुका महिला आघाडी अध्यक्षा मंजुषा तरोने, विजयाताई कापगते, चामेश्वर गहाणे, मुरलीधर ठाकरे, नूतन सोनवाने, देवेंद्र टेंबरे ,व्यंकट खोब्रागडे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.




