37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ मध्यस्थी प्रक्रियेमुळे लवकर न्याय मिळतो – न्या. त्रिवेदी

मध्यस्थी प्रक्रियेमुळे लवकर न्याय मिळतो – न्या. त्रिवेदी

0
22

blank

गोंदिया,दि. २५-मध्यस्थी प्रक्रियेमुळे पक्षकारांचा पैसा व वेळ वाचतो. परस्परांशी संबंध चांगले राहतात. वर्षानुवर्ष न्यायालयात प्रकरणे चालविण्यापेक्षा मध्यस्थी प्रक्रियेमुळे लवकर न्याय मिळतो, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. त्रिवेदी यांनी केले.
जिल्हा न्यायालय येथे जिल्हा मध्यस्थी केंद्राच्या वतीने नुकत्याच आयोजित मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून न्या. श्री त्रिवेदी बोलत होते. यावेळी जिल्हा मध्यस्थी केंद्राचे समन्वयक न्या. पी. एच. खरवडे, जिल्हा सरकरी वकील विणा बाजपेई, जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. राजकुमार बोंबार्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. न्या. खडवडे म्हणाले, न्यायालयात दाखल असलेल्या प्रकरणात विविध तांत्रिक अडचणी येतात. त्यामुळे न्यायालयीन प्रकरणे लवकर निकाली निघत नाही. ही प्रकरणे मध्यस्थीकरिता पाठवून लवकरात लवकर निकाली काढता येत असल्याचे सांगितले. अ‍ॅड. बोंबार्डे म्हणाले, मध्यस्थीने प्रकरणे निकाली काढण्याकरिता पक्षकारांनी आपली मानसिकता तयार केली पाहिजे. वकिलांनी पक्षकारांची प्रकरणे मध्यस्थीकरिता ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे सांगितले. प्रास्ताविकातून अ‍ॅड. बाजपेई यांनी मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमामागील भूमिका विषद केली. कार्यक्रमाला जिल्हा न्यायालयाच्या प्रबंधक नलिनी भारद्वाज, जिल्हा वकील संघाचे सचिव अ‍ॅड. आर. जी. राय, वकील संघाचे पदाधिकारी, नमाद महाविद्यालयाच्या विधी विभागाचे विद्यार्थी, न्यायालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित होता. संचालन अ‍ॅड. श्रीमती एम. पी. चतुर्वेदी यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. टी. बी. कटरे यांनी मानले. यशस्वितेसाठी विधी सेवा प्राधिकरणचे अधीक्षक के. टी. कढव, महेंद्र पिल्लेवान, शिवदास थोरात, आय. जी. गणवीर व इतर न्यायालयीन कर्मचाèयांनी परिश्रम घेतले.

blank