मुख्य अभियंता जनविर यांचे इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे स्वागत

0
11

गोंदिया,दि. २५-महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी नागपूर परिमंडळाचे विभाजन करून चंद्रपूर व गोंदिया हे दोन परिमंडळ तयार करण्यात आले आहेत. गोंदिया परिमंडळात गोंदिया व भंडारा या दोन जिल्ह्याचा समावेश आहे. नवनिर्मित गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून बी.के. जनविर यांनी नुकताच कार्यभार सांभाळला. त्या प्रसंगी सर्बोडिनेट इंजिनिअर्स असोसिएशनकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.
बी. के. जनविर नागपूर येथे गुणवत्ता व नियंत्रण विभागाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी qहगोली येथे अधीक्षक अभियंता पायाभूत आराखडा या पदावर कार्यरत होते. जनविर यांनी आय. आय.टी. मद्रास येथून एम. टेक. केलेले आहे. त्यांनी याप्रसंगी गोंदिया परिमंडळाची चांगली प्रगती होण्यास आपण सहकार्य करावे अशी इच्छा प्रगट केली. यावेळी सर्बोडिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे पदाधिकारी हरिश डायरे, सुनील मोहुरले, सुनील रेवतकर, सुमोत पांडे, विनय नेवारे, संदीप कावडे, अशोक बुदे, सुरज चव्हाण, अनुप ढोंके, गौतम भागवत, प्रदीप मोहितकर, प्रशांत वडस्कर आदी उपस्थित होते.