33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ ओबीसी सेवासंघाचे मार्चमध्ये जिल्हाअधिवेशन तर गोरेगाव तालुकाध्यक्षपदी आर.आर.अगडेंची निवड

ओबीसी सेवासंघाचे मार्चमध्ये जिल्हाअधिवेशन तर गोरेगाव तालुकाध्यक्षपदी आर.आर.अगडेंची निवड

गोरेगाव येथील ओबीसी सेवा संघाच्या जिल्हास्तरीय बैठकीत विविध विषयावर चर्चा

0
132

blank

गोरेगांव,दि.07:ओबीसी सेवासंघ गोंदिया जिल्हास्तरीय बैठक येथील माॅडेल कान्व्हेंट व ज्यु काँलेजच्या सभागृहात ओबीसी सेवा संघाचे कार्याध्यक्ष सी.पी.बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीत गोरेगाव तालुका ओबीसी सेवा संघाची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.तसेच येत्या मार्च महिन्यात ओबीसी सेवा संघाचे 3 जिल्हा अधिवेशन घेण्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.हे अधिवेशन ओबीसी संघर्ष कृती समिती व ओबीसी सेवा संघ यांच्या माध्यमाने आयोजित करण्यात येणार आहे.या अधिवेशनात अधिकारी कर्मचारी ओबीसी संघटनेलाही सोबत घेण्यात येणार आहे.बैठकीला ओबीसी सेवा संघाचे प्रदेश सचिव सावन कटरे,ओबीसी सेवा संघाचे जिल्हा संघटक डाॅ.गुरुदास येडेवार,जिल्हा सचिव डाॅ.प्रा.संजिव रहागंडाले,सडक अर्जुनी तालुकाध्यक्ष भुमेश्वर चव्हाण,सेवानिवृत्त शिक्षक ही.धा.येळे,केंद्रप्रमुख आर.आर.अगडे,ओबीसी संघर्ष कृती समितीच्या महिला उपाध्यक्ष छायाताई चव्हाण,ओबीसी संघर्ष कृती समितीचे मार्गदर्शक खेमेंद्र कटरे,डाॅ.एल.एस.तुरकर,प्राचार्य डी.आर.कटरे,विनायक येडेवार,देवचंद बिसेन,पी.डी.चव्हाण आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
blank
बैठकीत गोंदिया जिल्ह्यातील ओबीसी आंदोलनाच्या वाटचालींचा मागोवा घेण्यात आला.सोबतच ओबीसी सेवा संघ आणि ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने सयुंक्तपणे राबविण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहितीसह ओबीसी जनगणनेचा व सत्तासंपत्तीत भागीदारीचा विचार गावांगावात रूजवण्याचे आव्हान पाहुण्यांनी केले.ओबीसीं शेतकर्यांचा फक्त वापर करून घेणाऱ्या राजकिय -धार्मिक पक्षसंघटनांपासून सावध राहून संवैधानिक अधिकार मिळवण्यासाठी सामाजिक आंदोलनात योगदान देण्यासोबतच सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.जिल्ह्यात 1998 पासून सुरु झालेल्या संघटनेच्या कामाचा व विद्ममान संघटेनाचा आढावा घेत गावपातळीवर जाऊन प्रत्येक गावाता शाखा निर्माण करण्यावर चर्चा करण्यात आली.यावेळी ओबीसी समाजाने इतरांना मोठे करण्यापेक्षा स्वतः मोठे होण्यासाठी कार्य करावे,सामाजिक दबाव गट निर्माण करून आपले शेती,शिक्षण, स्वास्थ्य,रोजगाराचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावे असे विचार व्यक्त करण्यात आले.यावेळी ओबीसी सेवासंघ, गोरेगांवची तालुका शाखा पुनर्गठित करुन शिवजयंती निमित्त १९फेब्रुवारीला पुणे येथे होत असलेल्या ओबीसी सेवासंघाच्या ११ व्या राज्य अधिवेशनाचे वर्च्युअल प्रक्षेपण बघण्यासोबतच सहभागी होण्यावर माहिती देण्यात आली.मार्च महिण्यात गोंदिया ओबीसी सेवासंघाचे ३ रे जिल्हा अधिवेशन घेण्याचे निश्चित करुन 26 जून 2021 रोजी गोंदिया जिल्ह्यातील ओबीसी चळवळीच्या व्दिशतकीय वाटचालीनिमित्त एका कार्यक्रमाच्या आयोजनाच्या तयारी संदर्भात माहिती देण्यात आली.सभेचे संचालन भुमेश ठाकरे यांनी केले,प्रास्तविक रामेश्वर बागडे यांनी केले तर आभार हरिराम येरणे यांनी मानले.
गोरेगाव तालुका ओबीसी सेवा संघाच्या अध्यक्षपदी आर.आऱ.अगडे यांची सर्वानुमते निवड
गोरेगाव तालुका ओबीसी सेवा संघाच्या अध्यक्षपदी केंद्रप्रमुख आर.आर.अगडे यांची निवड करण्यात आली.सोबतच कार्याध्यक्षपदी  रामेश्वर बागडे,उपाध्यक्ष पालिक वालके,जे.जे.पटले,महासचिव भुमेश ठाकरे,सचिव डाॅ.श्याम फाये,सहसचिव धिरज बघेले,संघटक नरेंद्र चौरागडे,राजकुमार पटले,कोषाध्यक्ष पुरुषोत्तम साकुरे,प्रसिध्दीप्रमुख दिपक फाये,सुभाष बोपचे,सयोजंक हरिराम येरणे,संपर्क प्रमुख अरुण चन्ने व मार्गदर्शक म्हणून प्रा.आर.डी.कटरे,डाॅ.एल.एस.तुरकर,ही.धा.येडे आदींचा समावेश करण्यात आला.

blank