
आमदार विनोद अग्रवाल यांना निवेदन
गोंदिया : शहरातील रिंग रोड परिसरातील राजाभोज कॉलनी परिसराला विविध समस्यांनी ग्रासले आहे. मात्र, येथील समस्यांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. या परिसरातील समस्या त्वरित मार्गी लावण्यात यावे, अशा मागण्यांना घेऊन राजाभोज परिसरातील नागरिकांनी आमदार विनोद अग्रवाल यांना निवेदन दिले आहे.
शहरातील शहीद भगतसिंग वॉर्ड राजाभोज कॉलनीत जवळपास 400 ते 500 घरांची वस्ती आहे. कॉलनीतील नागरिकांनी बाहेर पडण्यासाठी एकच मुख्य मार्ग आहे. सध्या त्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी ये-जा करण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात यावे, तर याच मार्गावर एक लहान पूल असून तो जीर्ण झाला असून तो केव्हाही कोसळून मोठा अपघात घडू शकतो. या पूलाचे नव्याने बांधकाम करण्यात यावे, कॉलनीत एकच विद्युत ट्रान्सफार्मर असल्यामुळे वीजपुरवठा कमी असतो. परिणामी, घरातील बोअरवेल काम करत नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याची समस्या भेडसावत असते. येथे दुसऱ्या ट्रॉन्सफार्मरची व्यवस्था करण्यात यावी, परिसरात रस्त्यावर पथदिवे नसल्यामुळे परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी ये-जा करतेवेळी नाहक त्रास सहन करावी लागत आहे. अशा विविध समस्या या परिसरात आहेत. या मागण्यांकरिता मागील तीन वर्षांपासून लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतु, अद्याप कोणत्याही लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. करिता कॉलनीवासीयांनी या समस्यांना घेऊन आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडे धाव घेऊन निवेदन दिले. निवेदन देतेवेळी ओमप्रकाश बिसेन, गणेश बिसेन, अमित मंडल, टिकेश बोपचे, प्रविण मुजारिया, रोशन भानारकर, दिनेश रहांगडाले, लोकचंद बिसेन, लोकेश कटरे, अशोक टईकर, महेंद्र ठाकरे, नीरज पारधी, विलास टेंभरे, डिलेश्वर मेंढे, क्रष्णकुमार जामरे, तुलशीदास कटरे आदी उपस्थित होते.




