41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ ओबीसींच्या महामोर्चात सहभागी व्हा;शिवसेना,तेली महासभेचा पाठींबा

ओबीसींच्या महामोर्चात सहभागी व्हा;शिवसेना,तेली महासभेचा पाठींबा

0
53

blank

चामोर्शी--ओबीसी समाजाच्या अनेक न्याय मागण्यांसाठी २२ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसींच्यावतीने महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात तालुक्यातील ओबीसी समाजबांधवांनी शेकडोच्या संख्येने सहभागी व्हावे असे, आवाहन चामोर्शी येथील हनुमान मंदिर साधुबाब कुटी येथे घेतलेल्या सभेत करण्यात आले.
जिल्ह्यातील ओबीसींचे कमी करण्यात आलेले आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे, २0२१ च्या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावे. ओबीसी आरक्षणात मराठा समाजाचा समावेश करून नये, ओबीसी प्रवर्गाचे वर्ग ३ व ४ पदासाठी गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नंदूरबार, धुळे, नाशिक, ठाणे पालघर या जिल्ह्यातील कमी केलेले आरक्षण पूर्वत १९ टक्के करण्यात यावे व त्यानंतरच पोलिस भरती, आरोग्य विभागातील भरती व इतर पद भरती करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी ओबीसींच्या वतीने २२ फेब्रुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे.
सभेला महासभेचे प्रा. शेषराव येलेकर, हिरादेवे, कृषी सभापती रमेश बारसागडे, दिलीप चलाख, विनोद खोबे, राहूल नैताम, आशिष पिपरे, सुनिल कावळे, संतोष चावरे, प्रा. हिराजी बनपूरकर, रवी बोमनवार, अतुल येलमुले, हिम्मंतराव आभारे, खुशाल कापगते, कालिदास बुरांडे, रघुनाथ भांडेकर, वामन किनेकार, पुरुषात्तम घ्यार, शेषराव कोहळे, राकेश खेवले यांच्यासह तालुक्यातील ओबीसी बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

आरमोरी–जिल्ह्यातील ओबींसी बांधवाच्यावतीने २२ फेब्रुवारीला महामोर्चा जिल्हाधिकार्यालय काढण्यात येणार आहे. या मोर्चाला गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला असून या मोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शिवसैनिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आ. डॉ. रामकृष्ण मडावी यांनी केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षापासून ओबीसींचे असलेले ६ टक्के आरक्षण असून ते २७ टक्के करण्यात यावे. ओबीसी समाजाची २0२१ च्या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना करण्यात यावी, मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये, ओबीसी समाजातील वर्ग ३ व ४ ची पदे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नंदुरबार ,धुळे, पालघर या ठिकाणी १९ टक्के आरक्षण देऊन भरण्यात यावे. आदी मागण्या घेऊन ओबीसी समाजाचा महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच शिवसेनेचे जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख डॉ. रामकृष्ण मडावी यांनी जाही पाठिंबा जाहीर केला आहे.
या मोर्चामध्ये जिल्हाप्रमुख राजगोपाल सुलभावार,उपजिल्हा प्रमुख भरत जोशी, राजू कावळे, धर्मा राय, अरविंद कातट्रवार, रियाज शेख, नंदू कुमरे, राजू अंबानी, जिल्हा महिला संघटिका प्रभारी हेमलता वाघाडे, कल्पना तिजारे, अश्‍विनी चौधरी, कोरची तालुका प्रमुख रमेश मानकर, कुरखेडा तालुकाप्रमुख राहुल घोगरे, आरमोरी तालुकाप्रमुख महेंद्र शेंडे, वडसाचे डॉ. श्रीकांत बनसोड, गडचिरोली तालुका प्रमुख गजानन नैताम, धानोरा तालुका प्रमुख शेखर उईके, चामोर्शी तालुकाप्रमुख अमित यासलवार, नीलकमल मंडल, अहेरीचे अक्षय करपे, भामरागडचे खुशाल मडावी, चंदू बझलवार, दुर्गे टोकला, किसन मट्टामी, शिवसेनेचे नेते सुनील पोरेड्डीवार आदी शिवसेनेचे पदाधिकारी या ओबीसीच्या भव्य मोर्चामध्ये सहभागी होणार असून सर्व शिवसैनिक यांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.

blank