41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ निवेदन घेऊन गेलेल्या नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांची धमकी!

निवेदन घेऊन गेलेल्या नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांची धमकी!

0
61

blank

गडचिरोली,दि.14ः शहराचाच एक भाग असलेल्या नवेगाव येथील नागरिकांनी गावच्या मामा तलावात बांधल्या जाणाऱ्या विहीरीचे बांधकाम थांबविण्यात यावे .कारण यामुळे तलावातील पाण्याची पातळी  कमी होऊन परिसरातील  विहीरीतील पाण्याची पातळी खाली जाऊन जलसंकटाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो या विषयावर नवेगाव येथील नागरिकांनी 11 फेब्रुवारी रोजी  जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्येचे निराकरण करावे अशी विनंती केली .मात्र जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी त्यांचे निवेदन टेबलवर आपटून हे काम थांबणार नाही, असे चिडून सांगत या प्रकरणात गावकऱ्यांनी जर ऊठाठेवी केल्या तर त्यांचेवर प्रशासकिय कामात अडथळा आणल्याचा फौजदारी गुन्हा दाखल करू अशी धमकी दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी शनिवारी  गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.जिल्हाधिका-यांच्या अशा आडमुठेपणाच्या भूमिकेमुळे संतप्त ग्रामस्थांनी ‘जिल्हाधिकारी हटाओ’ आंदोलन व ऊपोषण करण्याचा इशारा दिल्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. 

नवेगाव येथील माजी मालगुजारी तलावात त्याभागातील आदिवासी विकास विभागाच्या इंग्रजी आश्रम शाळेच्या वसतीगृहाकरीता पाणी पुरवठा योजनेकरीता विहीर बांधकाम करण्याचा प्रस्ताव केला. या तलावातून गुराढोरांना पिण्याचे पाणी, शेतीला ओलीत होत असुन परिसरातील पाण्याची पातळी चांगली राहण्यास मदत होते. गावात अद्यापही नळ योजना नसल्यामुळे विहीरी व कुपनलिकांद्वारे गावात पाणी उपलब्ध होते. या तलावात जर मोठी विहीर बांधल्या गेली तर तलाव आटून परिसरातील पाण्याची पातळी खाली जाईल म्हणून सदर विहीरीचे बांधकाम थांबविण्यात यावे व पर्यायी व्यवस्था शोधावी. ही विनंती करण्यास नागरिक जिल्हाधिका-यांकडे गेले होते.

पत्रकार परिषदेत गावकऱ्यांनी सांगितले की 30 एप्रिल 2019 पासून या विषयावर प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असुन तत्कालीन कलेक्टर शेखर सिंह यांनी सदर बांधकामाला स्थगिती दिली होती. परंतु जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी त्यांचे काम होणार म्हणजे होणारच, पाणी काय तुमचे एकट्याचे आहे काय असे ऊर्मट प्रश्न निवेदनकर्त्यांनाच केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा यामागे काय हेतू आहे असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

सदर पाणीपुरवठा योजनेच्या कामाची ग्रामपंचायतीकडून परवानगी घेतलेली नाही. भूजल सर्वेक्षण विभागाने सुद्धा नवीन स्रोत शोधण्याचे पत्र ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग जिप गडचिरोली यांना दिले आहे. आश्रम शाळेकरीता कोटगल बैरेज चे पाणी घेतले जाऊ शकण्याचा पर्याय ऊपलब्ध आहे.असे असताना जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचा अट्टाहास कशासाठी असा प्रश्न संतप्त ग्रामस्थांनी ऊपस्थित केला आहे. गावातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याऐवजी निवेदनच धुडकावून लावत फौजदारी गुन्हे दाखल करण्याची धमकी देणा-या जिल्हाधिका-याविरोधात गावकऱ्यांनी हटाओ आंदोलनाचा इशारा दिला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे या संदर्भात तक्रार केली आहे.  प्रसंगी न्यालयात जाणार असल्याचेही सांगितले. पत्रकार परिषदेला ऊमेश ऊईके, प्रतिभा चौधरी, रामचंद्र गेडेकर, विजय फुकट, ऊमाकांत किरणापूरे, राजू देसाई, ऊमेश वानखेडे, विलास कन्नाके, चिचघरे, दुध,  पदा यासह अन्य ग्रामस्थ ऊपस्थित होते.

blank