
सालेकसा-वर्तमान काळात समाजापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास कोसो दूर राहिलेला आहे. इतिहासाच्या आधारे समाजाचे खरे भवितव्य अवलंबून असतं त्यामुळे आपला खरा इतिहास विशेष युवकांना व समाजाला करणे काळाची गरज आहे. त्याचबरोबर वर्तमानातील समाजाने अंधश्रद्धेपासून दूर राहिलं पाहिजे कारण विकासात खरा अर्थ निर्माण करणारे आहे त्यामुळे समाजातील लोकांनी जागृत होणं अत्यंत काळाची गरज आहे. महाराष्ट्र नररत्नांचे राज्य आहे त्यात जन्मलेले रत्न म्हणजे महामानव त्यांचे विचार समाजातील प्रत्येक घटकाने अंगिकारायला हवं असं वक्तव्य जितेंद्र आसोले यांनी केलं ते कुणबी महासंघ, महिला महासंघ सालेकसा व तालुक्यातील बहुजनांच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक स्थानावरून बोलत होते. समाज एका संघा खाली कसा येईल यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने चिंतनात्मक कार्य करणे ही काळाची गरज असून प्रत्येकाने समाज उन्नतीसाठी कार्य करावे समाज बळकट करण्यासाठी एकत्रित येऊन समाजाची ताकद दाखवणे अत्यंत गरजेचे आहे त्याचबरोबर समाज विकासावर ते प्रत्येकाने समोर येणे काळाची गरज आहे असे वक्तव्य कार्यक्रमाचे उद्धघाटक भरतभाऊ बहेकार यांनी केले.
कार्यक्रमाची अध्यक्षता पुरूषोत्तम मेंढे वनक्षेत्र सहायक लाखादुर यांनी केले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भुवनेश्वर शिवणकर उधोग अधिकारी नागपुर, माजी जि.प. सभापती लताताई दोनोडे, माजी प.स. सभापती सुनन्दा बहेकार, जयाताई डोये, टीनाताई चुटे प्रल्हाद वाढई, परसराम फुंडे, तुकाराम बोहरे, डॉ. भूषण फुंडे, राजेंद्र बागडे, अनिल फुंडे, वासुदेव फुंडे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश चुटे, संजय दोनोडे, राजू दोनोडे, मोरेश्वर फुंडे, नरेंद्र ब्रामणकर, वासुदेव चुटे, संतोष फुंडे, देवराम चुटे, मनोज ड़ोये, आदी मान्यवर कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते. अतिथींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जयंती महोत्सवात रांगोळी स्पर्धा, स्वच्छता अभियान, असं विविधांगी कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं. रॅलीमध्ये छत्रपति शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांची वेश-भुषा घातलेल्या व्यक्तींना घोड्यावर बसवून संपूर्ण गावातून रॅली काढण्यात आलं या रॅलीला तालुकावाशी यांनी भरभरून साथ दिली. शिवजयंती कार्यक्रमानिमित्त कुणबी महासंघ सालेकसाच्या वतीने उपस्थित पाहुन्याना शिवाजी महाराजाचे चित्र असलेले स्मृति चिन्ह भेट देण्यात आले. विशेष सहयोग करणाऱ्या समाजातील मान्यवरांचा अतिथींच्या हस्ते स्मृति चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय बारसे यांनी मांडले तर कार्यक्रमाचे संचालन बाजीराव तरोंने, नीलेश बोहरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संघटनेचे अध्यक्ष गिरजाशंकर मेंढे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गौरीशंकर भंडारकर, भुवन मेंढे, शाम येटरे, महेश बागड़े, जितेंद्र शेंडे, परमानन्द शिवणकर, रवि चुटे, राजकुमार बहेकार, देवेंद्र बहेकार, राजेन्द्र बहेकार, लखन बहेकार, सचिन बहेकार, खुशाल शिवणकर, चंद्रकुमार बहेकार, कृष्णा मेंढे, पवन पाथोडे, यशवंत शेंडे, राजू फुंडे कुणबी महासंघ व महिला कुणबी महासंघ तसेच समस्त बहुजन बांधवांनी कार्यक्रमासाठी खूप खूप परिश्रम घेतले.





