36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ भंडारा जिल्ह्यात 25,गोंदियात 24 सकारात्मक रुग्ण

भंडारा जिल्ह्यात 25,गोंदियात 24 सकारात्मक रुग्ण

0
139

blank

 गोंदिया– शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 03 मार्च रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात 24  रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली. आजपर्यंत 14480 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 14,135 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 159 आहे. 100 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 186 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 97.61 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.20 टक्के आहे तर डब्लिंग रेट 380.2 दिवस आहे.

भंडारा दि. 03 : जिल्ह्यात आज 21 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 13170 झाली असून आज 25 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 13771 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.64 टक्के आहे.आज 1446 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 25 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 1 लाख 35 हजार 626 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 13771 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 12, मोहाडी 01, तुमसर 03, पवनी 01, लाखनी 06, साकोली 02 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 13170 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 13771 झाली असून 274 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 327 झाली आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.64 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.37 टक्के एवढा आहे.

बुलडाणा आज पॉझिटिव्ह : 321 ,एकूण पॉझिटिव्ह : 19534,मृत्यू : 195,आतापर्यंत डिस्चार्ज : 16712,आजचे डिस्चार्ज : 294

यवतमाळ आज पॉझिटिव्ह : 155,एकूण पॉझिटिव्ह : 18,246,आज मृत्यु : 2,एकूण मृत्यु : 472
एकूण डिस्चार्ज : 16033,आज डिस्चार्ज 215

blank