
नागपूर,नागपूर-दुर्ग मार्गावर प्रति तास ११० किमीच्या गतीने चालणारी एलएचबी कोचची गाडी आता प्रति तास १३० किमीच्या गतीने चालविण्याचा निर्णय दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने घेतला आहे. गाड्यांची गती लक्षात घेता नागरिकांनी रेल्वे मार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
नागपूर-दुर्ग दरम्यानचे अंतर २६३ किमीचे आहे. या मार्गावर अलिकडे ११० वरून प्रति तास १३० पर्यंत गती वाढविण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे मार्गाच्या जवळपास कोणीही जावू नये. रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. प्राण्यांना रेल्वे रुळाजवळ चरण्यासाठी आणू नये. रेल्वे नियमांचे पालन न केल्यास वित्त आणि जीव हानी होवू शकते. अशा स्थितीत एखादी दुर्घटना झाल्यास रेल्वे नियमाप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल, असे आवाहन दपूम रेल्वेतर्फे करण्यात आले आहे. यानंतरचा टप्पा म्हणजे प्रति तास १६० च्या गतीचा असेल. त्या अनुषंगाने उपरोक्त मार्गावर कामे सुरू झाली आहेत. ट्रॅक रिन्युएशन, कंपाऊंड वॉल, एका रुळावरून दुसèया रुळावर घेण्यासंबधीच्या कामांचा यात समावेश आहे.
यासोबतच तुमसर रोड व तिरोडी मार्गावर तिरोडी तसेच सुकळी रेल्वे स्थानक माल वाहतुकीसाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. या स्थानकाहून व्यापारी मोठ्या प्रमाणावर मालवाहतुकीसाठी बुकींग करीत असून, हा चांगला प्रतिसाद म्हणायला हवा. विभागातील बिझनेस डेव्हलपमेंट युनिट सतत प्रयत्नशील आहे. त्यांच्याकडून मालवाहतुकीसंबधी माहिती व्यापाèयांना दिली जाते. सोबतच वाहतुकीसाठी प्रोत्साहित केले जात आहे. उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी नवीन पर्याय शोधून काढले जात आहेत. मालवाहतुकीमुळे रेल्वेलाच उत्पन्न मिळेल असे नाही तर अप्रत्यक्षरित्या देशातील जनतेलासुद्धा याचा लाभ मिळेल. व्यापाèयांनी दपूम रेल्वेच्या वाणिज्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सीआरएस निरीक्षण
तुमसर- तिरोडी मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरील विद्युतीकरणाचे निरीक्षण रेल्वे सुरक्षा आयुक्तांतर्फे (सीआरएस) बुधवार, १० मार्चला पार पडले. मंजुरी मिळताच या मार्गावर विद्युत इंजीनासह गाडी धावेल.




