33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ जि. प. मध्ये पत्रकारांवर गदा आणणारा ठराव रद्द करा -“पत्रकार संरक्षण समिती”

जि. प. मध्ये पत्रकारांवर गदा आणणारा ठराव रद्द करा -“पत्रकार संरक्षण समिती”

0
27

 , भाजपच्या कार्यक्रम व प्रसिद्दीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

वर्धा : जिल्हा परिषदेने पत्रकारावर गदा आणणारा ठराव येत्या स्थायी समितीच्या बैठकीत मागे घ्यावा अन्यथा पत्रकार संघटनेच्या वतीने भाजपच्या बातम्या प्रसिद्ध करण्यावर बहिष्कार टाकण्यात येईल अशा इशारा पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
वर्धा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दि. २४ डिसेंबर २०२० रोजी भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नितीन मडावी यांनी पत्रकारांवर गदा आणणारा ठराव पारीत करण्यात आला. या ठरावाच्या अनुषगाने मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबसे यांनी अध्यादेश काढून जिल्ह्यातील सर्व पंचायत समितींना देण्यात आला.
जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात कोणत्याही वृत्तपत्रात बातमी प्रकाशित झाल्यास जिल्हा परिषदेच्या वकिलामार्फत खटला चालविण्यात येणार असल्याचे ठराव नमुद केले आहे. त्यामुळे जिल्हास्तरावरील आणि ग्रामीण भागातील पत्रकारांवर आकसापोटी खटला चालविण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पत्रकारांवर गदा आणणारा ठराव त्वरीत रद्द करावा, या बाबत जिल्हाभरातील पत्रकारांनी निवेदन देवून मागणी करण्यात आली आहे. तरीही जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने याबाबत कुठलेही दखल न घेतल्याने तो ठराव रद्द केला नाही. त्यामुळे पत्रकार संघटनेच्या वतीने भाजपाच्या विविध कार्यक्रमास तसेच प्रसिद्धपत्रक प्रकाशित न करण्याचा बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा निवेदनद्वारे भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ . शिरीष गोडे याना देण्यात आला. यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष रविराज घुमे,कार्याध्यक्ष सत्तार शेख, नरेंद्र देशमुख, गजानन बाजारे यांची उपस्थिती होती.
या निवेदनाच्या प्रति भाजपचे विदर्भ संघटक मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर,आमदार समीर कुणावार, आमदार दादाराव केचे,आमदार रामदास आंबटकर याना देण्यात आली. 16 मार्च रोजी जिल्हा परिषदेची सभा असल्याने काय निर्णय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

blank