29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ प्रतापगड येथे पर्यटन सर्किट उभारणार : आमदार चंद्रिकापुरे

प्रतापगड येथे पर्यटन सर्किट उभारणार : आमदार चंद्रिकापुरे

0
43

blank

अर्जुनी मोरगाव : तालुक्यावर निसर्गाने मुक्त उधळण केली आहे. तालुक्यातील प्रतापगड किल्ला हा भोसलेकालीन साम्राज्याची ओळख आहे. हिंदू धर्मीयांचे प्राचीन शिवमंदिर आणि मुस्लीम धर्मीयांचे बाबा उस्मान गणी हारुनी यांचा दर्गा हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे दर्शन घडविणारे एकमेव प्रसिद्ध स्थान आहे. तालुक्यात पर्यटनास मोठ्या प्रमाणावर वाव आहे. प्रतापगड येथे पर्यटन सर्किट उभारण्यास प्रयत्न करणार असल्याचे मत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले.ते प्रतापगड येथे पर्यटन विकास निधी अंतर्गत विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्यात उद्घाटक म्हणून बोलत होते.

पर्यटन विकास निधि अंतर्गत महादेव पहाड़ी प्रतापगढ़ रस्त्याचे रूंदीकरण व अल्प संख्यांक विकास निधी अंतर्गत कब्रस्थान आवारभिंतीचे भूमिपूजन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते झाले. या वेळी सरपंच भोजराम लोगड़े, उपसरपंच उमेश मडावी, राकेश जायस्वाल, सदस्य छाया डोंगरवार, रेवता गहाने, गीता बावने, नलू हुर्रा, प्रकाश सलामे, हर्षा राउत, सुखदेव कनोजे, ग्रामसेवक डी.जी. दरवडे आणि प्रतापगड येथील गावकरी उपस्थित होते.

blank