
संतोष रोकडे
अर्जूनी/मोर-कोरोनाच्या लसीकरणासाठी कोणत्याही नागरिकांनी घाबरु नये, हे लसीकरण आपल्या जीवाची रक्षा करण्यासाठीच आहे, या लसीकरण मोहीमेचा प्रत्येक नागरिकांनी लाभ घेऊन यशस्वी करण्यासाठी उत्तम सहकार्य करण्याची गरज नागरिकांचीच आहे. असे प्रतिपादन बाराभाटी आयुर्वेदिक दवाखाण्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबर मडावी यांनी लसीकरणावेळी केले.
परिसरातील बाराभाटी आयुर्वेदिक दवाखाना आणि कुंभीटोला येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र याठिकाणी नियमीतरित्या लसीकरण नागरिकांसाठी सुरु आहे, आतापर्यंत ४० लोकांनी व गोठणगाव ८० लोकानी ४५ वर्षांपासून तर वरील वयोगटातील नागरिकांनी लसीकरण घेतले आहे अशी माहीती संबधीत वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.
लसीकरणाला घाबरू नये.
सदर लसीकरणाचा आरोग्यासाठी फायदाच आहे, आपला कोरोनापासून बचाव व्हावा, कोरोना होऊ नये म्हणून लसीकरण आवश्यक आहे. लसीकरणाची मनात कोणतीही भिती ठेवु नका, शासनच्या सुचना पाळा, माॅस्क लावा अशाही सुचनांचे मार्गदर्शन यावेळी आरोग्य विभागांनी केली आहे.लसीकरण सकारात्मक यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी मडावी, गौरव टेंभेकर, आरोग्य सेवक राजेंद्र वघारे, आरोग्य सेविका साखरे, राऊत व परिचर चेतना रामटेके आदी सेवा देत आहेत.





