42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ हक्काच्या पगारासाठी….. डॉ. रामटेके बसले उपोषणावर

हक्काच्या पगारासाठी….. डॉ. रामटेके बसले उपोषणावर

0
48

blank

साखरीटोला-कोरोना योद्धा म्हणून डॉक्टराचा एकीकडे सन्मान केला जात असतांना दुसरीकडे ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथील वैधकिय अधिक्षक डॉ. पी.एस. रामटेके यांना हक्काच्या पगारासाठी उपोषण आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
प्रकरण असे की डॉ. रामटेके 3 मार्च 2021 रोजी जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय गोंदिया यांच्याकड़े किरकोळ रजेचे अर्ज देऊन आपल्या मुलाच्या ब्रेनच्या औषधउपचारासाठी मुलाला घेऊन नागपुर गेले होते. मात्र जिल्हाधिकारी गोंदिया यांनी पत्र क्रमांक नै.आव्य/कोरोना/कावि-208/2021 दिनांक 8 मार्च 2021 रोजी पत्र काढून फरवरी आणि मार्च असे दोन महिन्याचे पगार थाबविन्याचे आदेश काढले आहे. त्यामुळे ते मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. कोरोना काळात घरचा आणि मुलाच्या औषधउपचाराचां खर्च कसा भागवावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. डॉ. रामटेके यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याकड़े वारवार विनंती केल्यावर सुद्धा पगार मिळाले नसल्यामुळे संतप्त झालेल्या डॉक्टरनी दिनांक 12 अप्रैल रोजी जिल्हाधिकारी गोंदिया, जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय गोंदिया, कोषागार अधिकारी गोंदिया, तहसीलदार सालेकसा, पोलिस निरीक्षक सालेकसा यांना पत्र देऊन थकित पगार मिळाले नाही तर 13 अप्रैल पासून आमरण उपोषणiवर बसणार असल्याची माहिती दिली होते. वरिष्ठ अधिकाऱ्यानी सदर मागणीकड़े लक्ष दिले नसल्यामुळे आज दिनांक 13 पासून उपोषणावर बसले आहे. उलेखनीय असे की सध्याच्या परिस्थितिमधे सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात फक्त एकच म्हणजे डॉ. रामटेके हेच कार्यरत आहेत आणि ते सुद्धा आज पासून उपोषणावर बसले असल्याने ग्रामीण रुग्णालय डॉक्टर विहीन झाले आहे. कोरोना संसर्ग काळात रात्रदिवस सेवा देणाऱ्या ड्राक्टराना वेळेवर पगार मिळत नसेल तर त्यांनी उपासी राहुन रुग्णाची सेवा करावी का असा प्रश्न गांवकरी करीत आहेत.
जिल्ह्यात व तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. गेल्या सहा दिवसांपासून दररोज कोरोनाच्या रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली असून अनेक भागांमध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अश्या प्रसंगी डॉक्टराची मनस्थिति चांगली असने गरजेचे आहे पगारापासून वंचित असलेल्या ड्राक्टराचां त्वरित पगार काढण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यानी केले आहे.

blank