
चिचगड ग्राम पंचायतीच्या कामचुकार प्रवृत्तीवर नागरिकांचा रोष
चिचगड,दि20:-खासगी जागेवर अतिक्रमण करून सुरू असलेले बांधकाम थांबविण्याविषयी प्राप्त एका अर्जावर चिचगडच्या अप्पर तहसीलदारांनी ग्रामपंचायतीला मौका चौकशी करून प्रश्न निकाली काढण्याच्या दिलेल्या आदेशाला ग्रामपंचायत प्रशासनाने केराची टोपली दाखविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक आठवडा उलटूनही कार्यवाही न केल्याचे ग्राम पंचायतीच्या कामचुकार प्रवृत्तीवर नागरिकांचा चांगलाच रोष असल्याचे सांगण्यात येत आहे.
सविस्तर असे की, फुलचंद नत्थु राऊत रा. चिचगड यांनी १९८८ साली 2500 वर्ग फुटाचे प्लॉट खरेदी केलेे होते. त्या जागेवर १९९० घराचे बांधकाम सुरु केले. पुढे काही कारणाने काम थाबंवून पुन्हा फेब्रुवारी २०२१ पासून घर बांधकामाला सुरवात केली. परंतु, राऊत यांच्या प्लाटवर चंदु पुनाराम वालदे यांनी अतिक्रमण करून राऊत यांच्या जाण्यायेण्याच्या मार्गावर अडथळा निर्माण केला. सदर अतिक्रमण काढून अर्जदाराचा रस्ता मोकळा करुन देण्यात यावा, याबाबत
विनंती अर्ज चिचगड अप्पर तहसील कार्यालयाला केले. यावर अप्पर तहसील कार्यालय चिचगड यानीं चिचगड ग्रामपंचायतला नियमानुसार मौका चौकशी करुन फुलचंद राऊत यांचा जाण्यायेणाचा रस्ता मोकळा करुन कायदा व सुव्यवस्था बाधीत होणार नाही याची दक्षता घेवुन अर्जदार व गैरअर्जदार दोन्ही पक्षात असलेला वाद सोडविण्यासंदर्भात आदेश दिला. य़ाउपर तसे दोन स्मरणपत्र सुद्धा तहसील कार्यालयाने ग्रामपंचायतीला दिले. असे असले तरी ग्रामपंचायत प्रशासनाने तहसीलदार यांचे आदेशाला केलाची टोपली दाखवून कुंभकर्णी झोप घेणे पसंत केल्याचे दिसून येत आहे.
जमिनमालकाच्या जागेवरील अतिक्रमण मौकाचौकशी करून काढण्यात यावा, आणि अर्जदाराचा जाण्यायेण्याचा मार्ग मोकळा करून तसा अहवाल सादर करण्याचा दिलेला आदेश आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासंदर्भाक केलेल्या सूचनांचे पालन न केल्याने भविष्यात या प्रकरणावरून ग्राप वाद पेटविण्याच्या मानसिकचे खुद्द असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.



