43.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ गडचिरोली जिल्ह्यात 168,वाशिम २७०,भंडारा 83,गोंदिया 29 कोरोना बाधित

गडचिरोली जिल्ह्यात 168,वाशिम २७०,भंडारा 83,गोंदिया 29 कोरोना बाधित

0
77

blank

गोंदिया-जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. ही निश्चितच दिलासा देणारी बाब आहे. असे असले तरी धोका टळलेला नाही. बाधितांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या कमालीने वाढली आहे. आज रविवार 23 मे रोजी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 29 कोरोनाबाधित आढळले. 264 कोरोनाबाधितांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पठविण्यात आले. तर जिल्ह्यातील कोरोनाबाधित 4 रुग्णांचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला.
आजपर्यंत 40,157 रुग्ण कोरोनाबाधित आढळले. 38, 776 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता 715 आहे. 343 क्रियाशील बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 666 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 96.56 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.62 टक्के आहे. आतापर्यंत 155246 नमुण्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली पैकी 21068 बाधित तर 129962 नमुणे नकारात्मक आले. 690 नमुन्यांचा अहवाल प्रलंबीत आहे. रॅपिड अँटीजेन चाचणीतून आतापर्यंत 150696 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये 20744 व्यक्तींचे अहवाल बाधित आले तर 129952 व्यक्तींचे अहवाल नकारात्मक आढळले.l

भंडारा, दि.23:- जिल्ह्यात आज 211 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 55878 झाली असून आज 83 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 57945 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.43 टक्के आहे.आज 1181 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 83 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 03 लाख 76 हजार 703 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 57945 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 38, मोहाडी 06, तुमसर 09, पवनी 02, लाखनी 06, साकोली 13 व लाखांदुर तालुक्यातील 09 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 55878 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 57945 झाली असून 1025 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 02 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1042 झाली आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.43 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.80 टक्के एवढा आहे

गडचिरोली जिल्ह्यात 173 कोरोनामुक्त, 7 मृत्यूसह 168 नवीन कोरोना बाधित

 गडचिरोली,दि.23: आज जिल्हयात 168 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 173 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 28710 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 26190 वर पोहचली. तसेच सद्या 1830 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 690 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 7 नवीन मृत्यूमध्ये  75 वर्षीय पुरुष गुड्डीगुडाम ता.अहेर, 45 वर्षीय पुरुष माडेमगांव ता.चामोर्शी , 72 वर्षीय पुरुष कुलकुली ता.आरमोरी, 72 वर्षीय पुरुष धुनडेशिवनी गडचिरोली, 61 वर्षीय पुरुष शाहु नगर वार्ड न. 21 गडचिरोली, 55 वर्षीय पुरुष नवेगाव गडचिरोली, 70 वर्षीय महिला आार्शिवाद नगर गडचिरोली  याचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.22 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 6.37 टक्के तर मृत्यू दर 2.40 टक्के झाला. नवीन 168 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 28, अहेरी तालुक्यातील 4, आरमोरी 8, भामरागड तालुक्यातील 0, चामोर्शी तालुक्यातील 76, धानोरा तालुक्यातील 5, एटापल्ली तालुक्यातील 3, कोरची तालुक्यातील 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 4, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 17, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 13 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 10 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 173 रूग्णांमध्ये गडचिरोलीमधील 63, अहेरी 3,  आरमोरी 2, भामरागड 06, चामोर्शी 19, धानोरा 21, एटापल्ली 9, मुलचेरा 8, सिरोंचा 18, कोरची 13, कुरखेडा 13 तसेच वडसा येथील 17 जणांचा समावेश आहे.

वाशिम जिल्ह्यात आणखी २७० कोरोना बाधित; ६५६ जणांना डिस्चार्ज
वाशिम : सिव्हील लाईन्स- १, प्रशासकीय इमारत परिसर- ५, गाभणे हॉस्पिटल परिसर- १, आययुडीपी कॉलनी- १, काळे फाईल- १, लाखाळा- ४, राम मंदिर जवळ- १, आरटीओ ऑफिस जवळ- १, संतोषी माता नगर- २, रेनॉल्ड हॉस्पिटल परिसर- १, जिल्हा रुग्णालय- १, शहरातील इतर ठिकाणचे- ३, अडोळी- १, एकांबा- १३, काजळंबा- १, वारला- १, देवठाणा- १.
मालेगाव : एसबीआय जवळ- १, शहरातील इतर ठिकाणचे- ३, कवरदरी- २, भौरद- २, डोंगरकिन्ही- १, दुबळवेळ- १, इराळा- १, जऊळका- ३, किन्हीराजा- ३, खडकी इजारा- ६, मसला- १, नगरतास कॅम्प- १९, पांगरखेडा- १, शिरपूर- ५, सुकांडा- २, तरोडी- १, वाडी रामराव- १, वरदरी खु.- १, वसारी- १.
रिसोड : एकता नगर- १, शहरातील इतर ठिकाणचा- १, भोकरखेड- १, देगाव- १, जोगेश्वरी- १, खडकी सदार- १, कोयाळी खु.- १, लेहणी- १, मांडवा- २, मसलापेन- १, मोप- ५, सवड- ३, वाकद- १, आगरवाडी- २.
मंगरूळपीर : शहरातील- २, आमगव्हाण- १, अरक- १, आसेगाव- २, चिंचाळा- १, दस्तापूर- १, हिरंगी- १, कंझारा- १, कोठारी- १, मंगळसा- १, शहापूर- १, मसोला- १, मोहरी- २, पार्डी ताड- १, सनगाव- १, शेलूबाजार- ८, शिवणी- १, शेंदूरजना मोरे- ३, वनोजा- १, वरुड- १, येडशी- १, कासोळा- २, पिंप्री अवगण- १.
कारंजा : अशोक नगर- १, बाबरे कॉलनी- १, गौतम नगर- १, कांचन विहार कॉलनी- १, कोहिनूर कॉलनी- १, मानोरा रोड- १, गुरु मंदिर जवळ- १, प्रोफेसर कॉलनी- १, सहारा कॉलनी- १, संतोषी माता कॉलनी- १, सिंधी कॅम्प- १, वाल्मिकी नगर- १, यशोदा नगर- २, बायपास रोड- १, बेलखेड- १, चादई- ५, धामणी- १९, धनज बु.- १, दोनद- ५, हिवरा लाहे- ४, काजळेश्वर- १, काकडशिवणी- १, कामरगाव- १, कार्ली- १, कोळी- १, कुपटी- २, मनभा- २, मेहा- १५, पसरणी- १, पिंपळगाव- २, पिंप्री मोडक- ४.
मानोरा : नगरपंचायत जवळील- १, संभाजी नगर- ३, शहरातील इतर ठिकाणचा- १, बेलोरा- १, बोरव्हा- १, इंझोरी- १, कारखेडा- ४, करपा- १, कोंडोली- १, सावळी- १, सोमठाणा- १, तळप- १, वरोली- १, धानोरा बु.- १, वाईगौळ- १.
जिल्ह्याबाहेरील १७ बाधितांची नोंद झाली आहे. तसेच, १३ बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती-एकूण पॉझिटिव्ह – ३८२४१,ऍक्टिव्ह – ३३५७,डिस्चार्ज – ३४४६३,मृत्यू – ४२०

blank