41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ बुद्ध पौर्णिमा निमित्त भदंत डॉ. चंद्रकित्ती यांचा ऑनलाइन धम्म देशना धम्म संदेश...

बुद्ध पौर्णिमा निमित्त भदंत डॉ. चंद्रकित्ती यांचा ऑनलाइन धम्म देशना धम्म संदेश कार्यक्रम

0
41

blank

गोंदिया:- तथागत गौतम बुद्धांचे मानवतावादी विचार आणि त्यांचा धम्म विश्व उद्धारक- जगाला तारक असा आहे. बुद्धांचे मानवतावादी विचार संदेश सर्व समाजातील जनमाणसात पोहचले पाहिजे जेणेकरून त्यानी त्याचा अनुसरण केले पाहिजे व आचरणात आणलं पाहिजे या ऊद्देश्याने संविधान मैत्री संघ, समता सैनिक दल, महिला सशक्तीकरण संघ व सर्वसमाज विचार महोत्सव समिती यांच्या संयुक्त वतीने विविध ऑनलाइन बौद्धीक व जागृती कार्यक्रम उपासक- उपसिका- विद्यार्थी सर्व सामान्यांसाठी आयोजित केले जात आहेत. बुद्व पौर्णिमा निमित्त आयोजित ऑनलाइन जागृती सप्ताह कार्यक्रम “बुद्ध आले दारी” अंतर्गत धम्म देशना व धम्म चर्चा ऑनलाइन वेबिनार बुधवार दि. 26 मई 2021 ला सायं 7 वाजता भदंत डॉ.चंद्रकित्ती मंजूश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली सम्पन्न होणार आहे. तसेच बुद्ध पौर्णिमा निमित्त वृक्षारोपण, बुद्ध वंदन- अभिवादन, बौद्ध बनो- बौद्ध दिखो या प्रकारे अन्य कार्यक्रम घेतले जात आहेत.
सर्व विदित आहे कि कोरोना महामारी च्या काळात फिजिकल डिस्टेंसचा पालन करत असताना बौध्द विहार येथे जाने संभव नाही . यासाठी ज़ूम ऐप्प वीडियो कांफ्रेंस च्या माध्यमातुन धम्म देशना व धम्म चर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. समस्त धम्म अनुयायी, उपासक और उपासिका याना या वेबिनार तसेच अन्य ऑनलाइन कार्यक्रमात भग घेऊन ज्ञान वर्धन करण्याचे आवाहन संविधान मैत्री संघ आणि मित्र संघटनानी केले आहे.

blank