
तिरोडा, दि.29 : पोवारी बोली, मराठी, हिंदी भाषेचे तिरोडा येथील प्रसिद्ध कवी तथा गजलकार देवेंद्र चौधरी यांचा हिंदी भाषेतील “सफर” गजलसह काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. तिरोडा तालुक्यात अनेक कलाकौशल्य आत्मसात असलेले विविध व्यक्तिमत्व आहेत, त्यापैकीच एक म्हणजे कवी देवेन्द्र.
कवी देवेंद्र चौधरी यांच्या जीवनातील हा तिसरा काव्यसंग्रह असून हिंदी भाषेतील प्रथम काव्यसंग्रह आहे. सदर काव्यसंग्रहात हिंदीच्या एकूण 100 गजल व कविता आहेत.
कवी देवेन्द्र यांचे यापूर्वी मराठीत “पणन” व पोवारी बोलीचा “मन को घाव” असे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. आता हिंदी भाषेतील ‘सफर’ हा तिसरा काव्यसंग्रह आहे.दिल्ली येथील फॉरएव्हर पब्लिकेशन यांनी “सफर” हा काव्यसंग्रह प्रकाशित केला असून अमेझानवर उपलब्ध असून घरपोच मागविले जावू शकते.




