
गोंदिया -तालुक्यातील कटंगी कला येथील आई बुद्ध विहारात समाज परिवर्तन विकास मंडळ कटंगी कला व भारतीय बौद्ध महासभा सर्कल नवरगाव कला यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता.26) भगवान बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नवरगाव सर्कलचे उपाध्यक्ष विजय मेश्राम हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अनिल हिरकने, राजेश डोंगरवार, प्रकाश श्यामकुमार, शेषराव,हुमने, चंद्रशेखर महाजन, वासुदेव कठाणे, प्रकाश रामटेके , देवेंद्र रामटेके, विजय गडपायले, रणजीत बनसोड, उत्तम रामटेके, नरेंद्र गजभिये, उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करून बुद्ध वंदनेने करण्यात आली. यावेळी मान्यवर वक्त्यांनी भगवान बुद्धाच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांची शिकवण प्रत्येक माणवाने अंगीकार करावी असे आव्हान करण्यात आले. यावेळी कटगी कला येथे भारतीय बौद्ध महासभेची शाखा गठित करून ती नवरगाव कला सर्कलमध्ये जोडण्याचा प्रस्ताव सर्वानुमते पारित करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सत्यभामा डोंगरवार, कमलाबाई वैद्य, सुजाता बाई ऋषी, शांताबाई बन्सोड, द्वारकाबाई मेश्राम, परमशीलाबाई हिरकने, चंद्रकलाबाई दाहाट, शकुंतला कठाणे, पप्पू मेश्राम, सतीश चंद्रिकापुरे, यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे संचालन हेमराज चंद्रिकापुरे यांनी तर आभार छत्रपती शहारे यांनी मानले.




