33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ गडचिरोली जिल्हयात 97,भंडारा 98,बुलडाणा 196,गोंदिया 60 नवीन कोरोना रुग्ण

गडचिरोली जिल्हयात 97,भंडारा 98,बुलडाणा 196,गोंदिया 60 नवीन कोरोना रुग्ण

0
81

blank

गोंदिया,दि.29 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 29 मे रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 60 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.91 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यातील कोरोना बाधित 2
रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.आजपर्यंत 40,590 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 39,538 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 367 आहे.178 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 685 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 97.41टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.61 टक्के आहे

गडचिरोली -जिल्हयात आज  97 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 173 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 29237 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 27473 वर पोहचली. तसेच सद्या 1050 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 714 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 4 नवीन मृत्यूमध्ये रा.खाकरी ता. चामोर्शी  जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील 43 वर्षीय पुरुष, रा. कोंडाळा ता. वडसा जि. गडचिरोली येथील 67 वर्षीय पुरुष गडचिरोली येथील 60 वर्षीय पुरुष  यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.97 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.59 टक्के तर मृत्यू दर 2.44 टक्के झाला.    नवीन 97 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 13, अहेरी तालुक्यातील 00, आरमोरी 06, भामरागड तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 07, धानोरा तालुक्यातील 03, एटापल्ली तालुक्यातील 11, कोरची तालुक्यातील 02, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 08, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 29, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 08 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 09 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 173 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 34, अहेरी 19,  आरमोरी 11, भामरागड 05, चामोर्शी 28, धानोरा 10, एटापल्ली 04, मुलचेरा 20, सिरोंचा 22, कोरची 02, कुरखेडा 03 तसेच वडसा येथील 15 जणांचा समावेश आहे.

भंडारा, दि.29:- जिल्ह्यात आज 80 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 56534 झाली असून आज 98 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 58575 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.51 टक्के आहे.आज 1844 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 98 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 03 लाख 84 हजार 764 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 58575 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 17, मोहाडी 03, तुमसर 06, पवनी 02, लाखनी 08, साकोली 57 व लाखांदुर तालुक्यातील 05 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 56534 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 58575 झाली असून 990 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 02 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1051 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.51 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.79 टक्के एवढा आहे.

बुलडाणा-आज पॉझिटिव्ह : 196,एकूण पॉझिटिव्ह : 84545,मृत्यू : 593,आतापर्यंत डिस्चार्ज :80848,आजचे डिस्चार्ज : 659

blank