
आज 04 रुग्णांना डिस्चार्ज
भंडारा, दि.1:- जिल्ह्यात आज 526 नागरिकांची कोविड चाचणी करण्यात आली असून एक वर्षानंतर प्रथमच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शून्य आली आहे. भंडारा जिल्ह्यात 27 एप्रिल 2020 रोजी कोविडचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर कधी एक आकडी तर कधी शून्य अशी रुग्ण संख्या 05 जुलै 2020 पर्यंत होती. 5 जुलै 2020 रोजी जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या शुन्य आली होती. त्यानंतर जिल्ह्यात रुग्ण वाढीचा आलेख चढताच राहला असून जवळपास एक वर्षानंतर आज 01 जुलै 2021 रोजी कोरोना रुग्ण संख्या शून्य निघाली आहे.आज 04 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58318 झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 59482 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.04 टक्के आहे. आज 526 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 00 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 04 लाख 16 हजार 690 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 59482 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.
जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह एकही रुग्ण निघाला नाही. भंडारा तालुक्यातील 00, मोहाडी 00, तुमसर 00, पवनी 00, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 अशी आजची स्थिती आहे. आतापर्यंत 58318 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 59482 झाली असून 36 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1128 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.04 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.90 टक्के एवढा आहे.
धोका संपला नाही -जिल्हाधिकारी
आज केलेल्या चाचण्यांमध्ये जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या शून्य आली आहे. ही दिलासादायक बाब आहे. असे असले तरी धोका मात्र अजूनही संपला नाही. कोविडच्या तिसऱ्या लाटेची चर्चा होत असतांना नागरिकांनी अधिक सावध रहाणे आवश्यक आहे. गाफीलपणा अजिबात परवडणार नाही. नागरिकांनी कोविड प्रोटोकॉल पाळणे गरजेचे आहे. -जिल्हाधिकारी संदीप कदम